शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

जिल्ह्यात आज चार व्यक्ती कोरोनामुक्त होऊन परतल्या घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 05:01 IST

भंडारा जिल्हा सुरुवातीला महिनाभर कोरोनामुक्त होता. मात्र गराडा येथील एक व्यक्ती पॉझिटिव्ह आली आणि जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. पाहता पाहता रुग्णांची संख्या ४१ वर पोहचली. त्यातही मुंबई-पुणे आदी महानगरातून आलेले व्यक्तीच कोरोनाबाधीत असल्याचे पुढे आले. जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत १८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर चार रुग्ण आज कोरोनामुक्त होऊन घरी पोहचले आहेत.

ठळक मुद्देआज एकही नवीन रुग्णाची नोंद नाही। आतापर्यंत १८ जण झाले कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या ४१ वर पोहचली असून आज चार व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी परतल्या आहेत. आतापर्यंत १८ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या असून सध्या २३ क्रियाशिल कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान आज एकाही नवीन रुग्णांची भर पडली नाही. त्यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.भंडारा जिल्हा सुरुवातीला महिनाभर कोरोनामुक्त होता. मात्र गराडा येथील एक व्यक्ती पॉझिटिव्ह आली आणि जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. पाहता पाहता रुग्णांची संख्या ४१ वर पोहचली. त्यातही मुंबई-पुणे आदी महानगरातून आलेले व्यक्तीच कोरोनाबाधीत असल्याचे पुढे आले. जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत १८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर चार रुग्ण आज कोरोनामुक्त होऊन घरी पोहचले आहेत. जिल्ह्यातील २३०५ व्यक्तींच्या घशातील स्त्रावांचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी २१४० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. १२४ नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे. ६ जून रोजी आयसोलेशन वॉर्डामध्ये २६ व्यक्ती भरती असून आतापर्यंत ३४८ व्यक्तींना आयसोलेशन वॉर्डातून सुटी देण्यात आली. कोवीड केअर सेंटर साकोली, तुमसर व मोहाडी येथे ३८५ व्यक्ती दाखल असून १५९८ व्यक्तींना हॉस्पीटल क्वारंटाईनमधून सुटी देण्यात आली आहे. मुंबई-पुणे व महानगरातून जिल्ह्यात ४० हजार ५०१ व्यक्ती दाखल झाले असून त्यापैकी २८ हजार ९२९ व्यक्तींचा २८ दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. अन्य ठिकाणाहून आलेल्या ११ हजार ५७२ व्यक्ती सध्या होम क्वारंटाईन आहेत.जिल्ह्यात साकोली तालुक्यात सर्वाधिक १९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्या खालोखाल लाखांदूर तालुक्यात ११, भंडारा तालुक्यात ५, पवनी ३ आणि तुमसर, मोहाडी आणि लाखनी तालुक्यात प्रत्येकी १ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करून प्रादूर्भाव रोखण्याचे प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या