शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

‘आयुष्यमान’साठी जिल्ह्यात १ लाख ३४ हजार कुटुंब पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 22:43 IST

आयुष्यमान भारत - प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसाठी भंडारा जिल्ह्यातील १ लाख ३४ हजार ४८८ कुटूंब पात्र ठरले असून ई-कार्ड तयार करण्याचे व रुग्णांना योजनेचा लाभ देण्याचे कार्य सुरु झाले आहे. या योजनेंतर्गत सामाजिक, आर्थिक, जातीनिहाय सर्वेक्षण - २०११ मधील कुटुंबांना प्रती वर्ष पाच लाखापर्यंत शस्त्रक्रिया व उपचाराचा लाभ मिळणार आहे.

ठळक मुद्देप्रधानमंत्री जनआरोग्य योजना : ई-कार्ड तयार करुन घेण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आयुष्यमान भारत - प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसाठी भंडारा जिल्ह्यातील १ लाख ३४ हजार ४८८ कुटूंब पात्र ठरले असून ई-कार्ड तयार करण्याचे व रुग्णांना योजनेचा लाभ देण्याचे कार्य सुरु झाले आहे. या योजनेंतर्गत सामाजिक, आर्थिक, जातीनिहाय सर्वेक्षण - २०११ मधील कुटुंबांना प्रती वर्ष पाच लाखापर्यंत शस्त्रक्रिया व उपचाराचा लाभ मिळणार आहे.केंद्र सरकारने आयुष्यमान भारत - राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियानांतर्गत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना २१ मार्च २०१८ पासून सुरु केली आहे. या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. भंडारा जिल्ह्यात १ लाख ३४ हजार ४४८ कुटूंब या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना सुरु असून जिल्ह्यातील खासगी रुग्णालयातही लवकरच ही योजना सुरु होणार आहे. आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारी आरोग्य विमा योजनेसाठी निकषानुसार लाभ दिला जाणार आहे. त्यात लाभार्थी सामाजिक, आर्थिक जातनिहाय सर्वेक्षण २०११ च्या यादीमधील कुटुंबातील असावा, कुटुंबातील सदस्यसंख्या वय, लिंग याचे कोणतेही बंधन नाही. देशभरातील कोणत्याही मान्यताप्राप्त शासकीय किंवा खासगी रुग्णालयातील या सेवेचा लाभ मिळणार आहे. रुग्णालयामध्ये नि:शुल्क भरती प्रक्रिया १३९३ आजारावर उपचार व शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेचे ई-कार्ड असणे मात्र आवश्यक आहे.भंडारा जिल्ह्यात सदर योजनेचे ई-कार्ड नि:शुल्क तयार करून देण्यात येणार आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला स्वतंत्र ई-कार्ड तयार करावे लागेल. त्यासाठी लाभार्थ्याला मुळ शिधापत्रिका, मुळ आधारकार्ड, मोबाईल नंबर घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालय, रंगारी नर्सिंग होम, नाकाडे नर्सिंग होम, पेस हॉस्पीटल, सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालय तुमसर यापैकी एका ठिकाणी जाऊन आपले कार्ड बनवून घ्यावे लागणार आहे.भंडारा जिल्ह्यामध्ये आयुष्यमान भारत योजनेंतर्गत ई-कार्ड बनविण्याचे व रुग्णांना लाभ देण्याचे कार्य सुरु झाले असून पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-कार्ड तयार करून घ्यावे.-शांतनू गोयल, जिल्हाधिकारी,