शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा क्रीडा संकुल उठले खेळाडूंच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 22:04 IST

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या अधिनस्थ जिल्हा क्रीडा संकुलात विविध सुविधांचा अभाव आहे. येथील गटाराच्या टाक्याचे झाकण उघडे असून हायमास्ट लाईटही बंद आहे. मुख्य मैदानावर मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे.

ठळक मुद्देसुविधांचा अभाव : हायमास्ट बंद, गटाराच्या टाक्याची झाकण उघडे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या अधिनस्थ जिल्हा क्रीडा संकुलात विविध सुविधांचा अभाव आहे. येथील गटाराच्या टाक्याचे झाकण उघडे असून हायमास्ट लाईटही बंद आहे. मुख्य मैदानावर मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. अशा परिस्थितीत अपघात होण्याची कायम भिती आहे. सोमवारी सायंकाळी स्केटींगचा सराव करतांना एका खेळाडूच्या अंगावर संरक्षण कठडा कोसळल्याने तो जखमी झाला. येथील कारभार प्रभारी अधिकाऱ्यावर असल्याने कोणत्याही सुविधा दिल्या जात नाही. त्याचा मनस्ताप खेळाडूंना होत आहे.येथील बसस्थानक परिसरात जिल्हा क्रीडा संकुल ‘शिवाजी स्टेडीयम’ आहे. याठिकाणी शहरातील शेकडो विद्यार्थी खेळाचा सरावासाठी जातात. सकाळपासून रात्रीपर्यंत याठिकाणी खेळाडूंची गर्दी असते. पंरतु तेथे या खेळाडूंसाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात नाही. येथील मुख्य मैदानावरच मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. या गवताकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे. बॅटमिंटन इनडोअर स्टेडीयमकडे जाणाºया मार्गावर गटाराचे झाकण उघडे आहे. उघडे गटार अपघाताला आमंत्रण देत आहेत. स्केटींग ग्राऊंडवर संरक्षणासाठी लोखंडी जाळीचे मोठे कठडे लावण्यात आले आहे. यातील अनेक कठड्यांचा खालील बाजूंचा मुख्य आधार तुटलेला आहे. त्यामुळे संरक्षण कठडे अनेकदा कोसळतात. अनेक कठड्यांना तर चक्क तारांनी तात्पुरत्या स्वरुपात बांधले आहेत.जिल्हा क्रीडा संकुलात प्रकाश व्यवस्थेसाठी हायमास्क लाईट लावण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही लाईट बंद आहेत. त्यामुळे सायंकाळ नंतर मैदानावर अंधाराचे साम्राज्य पसरते. यामुळे सरावासाठी येणारे खेळाडू आणि व्यायामासाठी येणारे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतो. विशेष म्हणजे या क्रीडांगणावर मोठ्या प्रमाणात विद्यार्थीनी सरावासाठी येतात. पंरतु लाईट व्यवस्थेअभावी एखाद्यादिवशी अप्रिय घटना होण्याची भीती आहे.येथील जिल्हा क्रीडा अधिकारी प्रभारी आहे. त्यामुळे येथे कोणत्याही सुविधा तात्काळ उपलब्ध होत नाही. येथील जलतरण तलाव तर गत काही महिन्यांपासून कायमचे बंद आहे. अशा एकना अनेक सुविधांचा अभाव येथे आहे. खेळाडू याबाबद वारंवार तक्रारी करतात पंरतु त्यांच्याकडे कुणीही लक्ष देत नाही. खेळाडंूचे भविष्य उज्वल करणाºया या क्रीडा संकुलाकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत आहे. परिणामी खेळाडूंना येथे योग्य वातावरण मिळण्यास अडचणी जात आहेत.स्केटींग करतांना अंगावर कोसळले सुरक्षा कठडेजिल्हा क्रीडा संकुलातील स्केटींग ग्राऊंडवरील नादुरुस्त लोखंडी ग्रील अंगावर पडल्याने पाच वर्षीय स्पर्श उदय दमाहे हा खेळाडू जखमी झाला. स्पर्श सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता स्केटींगची प्रॅक्टीस करीत होता. त्यावेळी त्याच्या अंगावर लोखंडी जाळीदार कठडे कोसळल्याने त्याच्या हाताची चार बोटे मोडल्या गेली. त्याला पालकानी तात्काळ दवाखान्यात नेले. त्याच्या हाताला आता प्लॉस्टर बांधले आहे. याबाबत पालक उदय दमाहे यांनी जिल्हा क्रीडा अधिकाºयांना पत्र दिले असून यापत्रातही त्यांनी येथील व्यवस्थेवर ताशेरे ओढले आहे.स्पर्श दमाहे हा स्केटींगची प्रॅक्टीस करतांना जखमी झाला. त्याला आम्ही रुग्णालयात नेले. सर्व बाबींची चौकशी करुन येथे सर्व सुविधा कशा देता येतील याचा प्रयत्न सुरु आहे.- प्रशांत दोंदलप्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी