शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात गटशेती योजनेचा फज्जा

By admin | Updated: January 18, 2015 22:41 IST

महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या विकासासाठी व उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्याचा संकल्प केला. त्यातीलच एक प्रकार गटशेतीचा आहे. भंडारा जिल्ह्यात एक हजार गट शेतीधारक आहेत.

संजय मते - आंधळगावमहाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या विकासासाठी व उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्याचा संकल्प केला. त्यातीलच एक प्रकार गटशेतीचा आहे. भंडारा जिल्ह्यात एक हजार गट शेतीधारक आहेत. मात्र आत्मा फाउंडेशन पुणे व कृषी विभागाच्या बेजबाबदारपणामुळे या योजनेचा फज्जा उडाल्याचे चित्र जिल्ह्यात दिसते. विदर्भासह जिल्ह्यात सुद्धा गटशेती केवळ कृषीविभाग व आत्मा कंपनीच्या कागदावरच दिसून येते. जिल्ह्यातील पारंपारिक शेती पद्धतीमुळे शेतकरी नेहमीच आर्थिक संकटात सापडत आहे. या संकटातून शेतकऱ्यांची सुटका व्हावी आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शासनाने गटशेती ही योजना तयार केली. यामध्ये शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविणे आणि त्यासाठी शेतमालाची विक्री सहजतेने करता यावी, अशी गटशेतीची मूळ संकल्पना होती. शेतकऱ्यांसाठी सामूहिक शेतीचा दृष्टीकोन समोर ठेवून उपलब्ध साधन सामुग्रीचा सामूहिक वापर करणे, बियाणे, खते, किटकनाशके आदींचा खर्च सामूहिकरित्या केल्यास शेतकऱ्यांना शेती परवडेल तसेच शेतमालाची विक्रीही सामूहिकरित्या करून चांगला नफा मिळविण्याचा उद्देश या योजनेचा आहे. आत्मा व कृषी विभागाने या योजनेचे केवळ कागदी घोडे नाचवून शेतकऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आल्याचे कागदोपत्री दाखविले. गटशेतीत पिकाच्या लागवडीपासून काढणीपर्यंत मोठा खर्च होतो. मात्र यानंतरही शेतकऱ्यांच्या पदरी जेमतेम उत्पन्न येते. अनेक शेतकऱ्यांनी गट स्थापन केले. मात्र त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या चांगल्या योजनांचा बोजवारा उडवत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. दरम्यान जिल्ह्यात आत्मांतर्गत राबविण्यात येणाऱ्या गटशेती योजनेच्या कामावर जिल्हा विभागाचे नियंत्रण आहे. या शेतीसाठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यात येत असून शेतमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध होत असल्यामुळे योजनेला शेतकऱ्यांची सुद्धा पसंती आहे. मात्र सर्व कागदोपत्री घोडे चालत असल्याने गटधारक शेतकरी महत्त्वाकांक्षी योजनेपासून वंचित असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.