शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
4
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
5
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
6
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
7
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
8
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
9
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
10
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
11
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
12
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
13
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
14
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
15
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
16
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
17
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
18
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
20
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच

जिल्हा रुग्णालय अग्निशमन यंत्रणेविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 06:00 IST

जुनी इमारत असलेल्या बाह्य रुग्णविभाग व वॉर्डसह कार्यालयीन कामकाज होत असलेल्या इमारतीची अवस्था बिघडत चालली आहे. बांधकाम भक्कम असले तरी बाहेरील भागाच्या भिंतींना काही ठिकाणांहून तळे गेले आहेत. अनेक खिडक्यांची काचे फुटलेली असून त्या घाणीने माखलेल्या आहेत. अनेकदा रुग्णही त्या खिडकींमधून सांडपाणी, वाचलेले अन्न व अन्य केरकचरा बाहेर फेकतात.

ठळक मुद्देरुग्णांचा जीव टांगणीला : जुन्या इमारतीलाही गेले तडे, ४५० खाटांचे रुग्णालय

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोरगरीब रुग्णांच्या आरोग्यासाठी संजीवणी ठरणारे भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय जीवघेणे ठरू पाहत आहे. ४५० खाटांच्या रुग्णालयात आधुनिक अग्निशमन यंत्रणा कार्यान्वीत नाही. वेळप्रसंगी रुग्णालयाच्या इमारतीत आग लागल्यास लहान सिलिंडर्स (फायरसेफ्टी हायड्रंट) व पालिकेच्या अग्निशमन बंबावर अवलंबून रहावे लागेल, यात शंका नाही.१४ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात भंडारा मुख्यालयी जिल्हा रुग्णालयाची भव्य वास्तू आहे. विस्तीर्ण क्षेत्रात असलेल्या रुग्णालय परिसरात कोट्यवधी रूपये खर्चून भव्य इमारती उभारण्यात आल्या आहेत.जुनी इमारत असलेल्या बाह्य रुग्णविभाग व वॉर्डसह कार्यालयीन कामकाज होत असलेल्या इमारतीची अवस्था बिघडत चालली आहे. बांधकाम भक्कम असले तरी बाहेरील भागाच्या भिंतींना काही ठिकाणांहून तळे गेले आहेत. अनेक खिडक्यांची काचे फुटलेली असून त्या घाणीने माखलेल्या आहेत. अनेकदा रुग्णही त्या खिडकींमधून सांडपाणी, वाचलेले अन्न व अन्य केरकचरा बाहेर फेकतात.वॉर्डावॉर्डात खाटांची सुविधा असली तरी रुग्णसंख्या वाढल्यास रुग्णांना खाली झोपावे लागते. त्यातच आगीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ठिकठिकाणी फायरसेफ्टी सिलिंडर लावण्यात आले आहे. मात्र आधुनिक पद्धतीने आगीवर मात करण्यासाठी असलेली उपकरणे जुन्या इमारतीत उपलब्ध नाहीत. फायरसेफ्टी स्प्रिंकलर सिस्टम, स्मोकन, अलार्म यंत्रणा, फायर एक्टिंग्युशर ही यंत्रणाही रुग्णालयात उपलब्ध नाही. याशिवाय फायर एस्केप व लॅडरही उपलब्ध नाही. नवीन बांधकाम करण्यात येत असलेल्या इमारतीमध्ये सदर यंत्रणा कार्यान्वीत करण्याच्या स्पष्ट सूचना असून त्यानुसार कार्यही होत आहे. परंतु जुन्या इमारतीत ही सुविधा उपलब्ध नाही.परिणामी भविष्यात वॉर्ड असलेल्या इमारतीत आग लागल्यास रुग्णांच्या जीवाला मोठा धोका आहे. हातात मावनारे सिलिंडरर्स आगीवर कितपत आळा घालतील, ही विचारात घालणारी बाब आहे. दुसरीकडे खाजगी रुग्णालयांना उपरोक्त सर्व सुविधा रुग्णालयात उपलब्ध करणे बंधनकारक केले असताना जिल्हा रुग्णालयातच दिव्याखाली अंधार आहे.रुग्णालयात फायरसेफ्टीसाठी सिलिंडर्स उपलब्ध आहेत. स्प्रिंकलर सिस्टम व स्मोकन अलार्म यावर लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे.-प्रमोद खंडाते, जिल्हा शल्यचिकित्सक, भंडारा

टॅग्स :hospitalहॉस्पिटल