शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा सामान्य रुग्णालय ऑक्सिजन, खाटांनी सुसज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 05:00 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क भंडारा : कोरोना संसर्ग वाढू लागल्याने जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून जिल्हा सामान्य रुग्णालय ऑक्सिजन, ...

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संसर्ग वाढू लागल्याने जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून जिल्हा सामान्य रुग्णालय ऑक्सिजन, खाटा यांसह औषध साठ्याने सुसज्ज बनले आहे. ६२० ऑक्सिजन खाटा आणि १० हजार १०० रेमडेसिवीर इंजेक्शन्स सद्यस्थितीत उपलब्ध आहेत. कोणत्याही परिस्थितीत तिसरी लाट रोखायचीच, यादृष्टीने आरोग्य प्रशासन कामाला लागले आहे.राज्यात सर्वत्र ओमायक्राॅनचे संकट घोंगावत आहे. भंडारा जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तीन दिवसात ३२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तिसरी लाट रोखण्यासाठी तयारी केली आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ६२० खाटांचा सुसज्ज कोविड वाॅर्ड तयार आहे. पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनही उपलब्ध आहे. १३ किलोलिटर लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा प्लांट येथे आहे. यासोबतच २६१ ऑक्सिजन सिलिंडर, ८० ड्युरा सिलिंडर रुग्णालयात सद्यस्थितीत उपलब्ध आहेत. आणखी गरज पडल्यास यात वाढ करण्याची प्रशासनाची तयारी आहे. यासोबतच शहरातील शाळा, महाविद्यालये कोविड केअर सेंटर म्हणून ताब्यात घेण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. जिल्हा रुग्णालयात सध्या १० हजार १०० रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा साठा असून म्युकरमायकोसिससंदर्भात ३०० इंजेक्शन्सचा साठा करून ठेवण्यात आला आहे. मनुष्यबळही पुरेसे असल्याने कोरोनाची लाट रोखण्यासाठी जिल्हा रुग्णालय सुसज्ज करण्यात आले आहे. आता नागरिकांनी कोरोना होऊच नये यासाठी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. 

कुलर आणि गिझरची खरेदीn दुसऱ्या लाटेत उन्हाळ्याच्या दिवसात कोविड केअर सेंटरमध्ये असलेल्या रुग्णांना विविध समस्यांचा सामना करावा लागला होता. या समस्या आता दूर करण्यात आल्या असून १५ कुलरची खरेदी करण्यात आली आहे, १० गिझर लावण्यात आले आहेत. अडीच लाख लिटर पाण्याची टाकीही रुग्णालय परिसरात आहे.

तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पुरेशी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आठ ऑक्सिजन प्लांट रुग्णालय परिसरात असून वीज क्षमताही वाढविण्यात आली आहे. औषधी आणि इंजेक्शन्सचा साठा उपलब्ध आहे. आग प्रतिबंधात्मक सर्व उपाय करण्यात आले आहेत.-डाॅ. आर.एम. फारुखी,  जिल्हा शल्य चिकित्सक

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMedicalवैद्यकीय