शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा तापाने फणफणतोय

By admin | Updated: October 11, 2015 01:54 IST

वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलाच्या परिणामाने भंडारा तापाने फणफणल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालय,

स्वाईन फ्लू आजाराने मृत्यूनंतर आरोग्य विभागात खळबळभंडारा : वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलाच्या परिणामाने भंडारा तापाने फणफणल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालय, आरोग्य केंद्र तथा खासगी दवाखाण्यात होत असलेल्या रुग्णांच्या गर्दीवरुन दिसत आहे. आॅक्टोंबरमध्ये भंडारा जिल्ह्यात हजारो तापाचे रुग्ण आढळले आहेत. स्वाईन फ्लूसोबत डेंग्यू, मलेरिया व गॅस्ट्रोमुळे भंडारेकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तापाच्या रुग्णांची आकडेवारी महिन्याभरात वाढत राहणार असल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली. दोन आठवड्यापासून ऊन जिल्हावासीयांना असह्य झाले आहे. हवामानातील विलक्षण बदलाने जिल्ह्यात तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र, उन्हामुळे डेंगीच्या रुग्णांची संख्या घटत असल्याचा दावा आरोग्य प्रशासनाने केला असला तरी डेंगीची दहशत कायम आहे. हिवताप विभागामार्फत केलेल्या सर्वेक्षणात मागील सहा महिन्यात जिल्ह्यातून एकुण २ लक्ष ८१ हजार ५२८ जणांचे रक्त नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याअंतर्गत २ लक्ष ६६ हजार ४१४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६३ नमुने पॉझीटीव्ह आढळले. तसेच डेंग्यूचे चार रुग्ण पॉझीटीव्ह आढळले. हे रुग्ण लाखांदूर तालुक्यातील मोहरणा प्राथमिक आरोग्य केंद्र व साकोली तालुक्यातील सानगडी प्राथमिक आरोग्य केंद्रात नोंदणीकृत आहेत. मलेरियाच्या एकुण पॉझीटीव्ह रुग्णांपैकी ‘पीव्ही मलेरिया’ अंतर्गत रुग्णांची संख्या ४३ असून ‘पीएफ मलेरिया’ अंतर्गत रुग्णांची संख्या २० आहे. महिनाभरापासून पावसाने पूर्ण पाठ फिरवल्याने जिल्ह्यात तापाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्ह्यात काही भागात तुरळक स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. या आजाराने एकाचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे सावधगिरीच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. (नगर प्रतिनिधी)