शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
2
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
3
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
4
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
5
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
6
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
7
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
8
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
9
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
10
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
11
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
12
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
13
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
14
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
15
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
16
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
17
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
18
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
19
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप

जिल्हा दुग्ध संघाचा दोन कोटींचा प्रकल्प मंजूर

By admin | Updated: March 30, 2017 00:31 IST

जिल्हा दुग्ध उत्पादक संघाला रॅशन बॅलेंसिंग कार्यक्रमाअंतर्गत १ कोटी ७७ लाख रूपयांचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. .....

सुनील फुंडे यांचे प्रतिपादन : जिल्हा दुग्ध संघाची सभाभंडारा : जिल्हा दुग्ध उत्पादक संघाला रॅशन बॅलेंसिंग कार्यक्रमाअंतर्गत १ कोटी ७७ लाख रूपयांचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. याची अंमलबजावणी एप्रिल महिन्यात करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी केले. जिल्हा दुग्ध संघाच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी हे होते. यावेळी सुनिल फुंडे म्हणाले, रॅशन बॅलेंसिंग प्रोग्रामअंतर्गत १५० गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये लोकल रिसर्च पर्सन त्याच गावातील व्यक्तीला काम दिले जाणार आहे. त्यांचा मेहनताना दीड ते दोन हजार रूपये असून त्याला एक लॅपटॉप दिला जाणार आहे. सदर प्रकल्प चालविण्यासाठी एक तांत्रिक अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी आणि दोन कृषी अधिकारी असतील. जे शेतकऱ्यांना कृषी व दुग्ध व्यवसाय व इतर माहिती देतील. या प्रकल्पासाठी ४,५०० लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. एका लाभार्थ्याला दोन जनावरे देण्यात येणार असून ९ हजार जनावरे लाभार्थ्यांना दिले जाईल. लाभार्थी गावातील इतर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देईल, असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असे सांगितले.यावेळी संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी म्हणाले, जानेवारी महिन्यात केंद्र शासनाने केलेल्या कार्यशाळेत देशातील दुग्ध संघाचे संचालक उपस्थित होते. त्यावेळी कृषी पशुसंवर्धन विभागाच्या सचिवानी दुधाचा पुरवठा दुग्ध संघालाच करावा, असे आदेश काढले होते. त्याचे पालन दुग्ध संघ करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी दुग्ध उत्पादक संघाचे संचालक उपस्थित होते. संचालन व्यवस्थापक करण रामटेके यांनी केले. (शहर प्रतिनिधी)