शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली घारपिंडे कुटुंबीयांना हिंमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:40 IST

गोरेगाव : तालुक्यातील सोनी येथील देवचंद घारपिंडे यांच्या घरावर वीज कोसळून घर जळाल्याची घटना (दि. १०) शनिवारी घडली. ...

गोरेगाव : तालुक्यातील सोनी येथील देवचंद घारपिंडे यांच्या घरावर वीज कोसळून घर जळाल्याची घटना (दि. १०) शनिवारी घडली. जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी रविवारी (दि. ११) घारपिंडे यांच्या घरी जाऊन त्यांच्या घराची प्रत्यक्ष पाहणी करून घारपिंडे कुटुंबाला धीर दिला.

यावेळी उपविभागीय अधिकारी अजयकुमार नष्टे, तहसीलदार सचिन गोसावी, नायब तहसीलदार रहांगडाले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, निरीक्षण अधिकारी नीलेश देठे, तलाठी हस्तरेखा बोरकर, पुरवठा निरीक्षक समीर मिर्झा उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी देवचंद घारपिंडे यांच्या कुटुंबाशी संवाद साधन संपूर्ण परिस्थिती जाणून घेतली. कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने दैनंदिनी कामासाठी उपयोगात येणाऱ्या वस्तू गोळा करून तात्पुरती मदत म्हणून रेशन किट भेट दिली. घारपिंडे कुटुंबाचे वीज पडून घर जळाल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची तात्पुरती राहण्याची सोय प्राथमिक शाळेत करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी खवले म्हणाले, एक व्हाॅट्सॲप ग्रुप तयार करून घारपिंडे कुटुंबाची आर्थिक अडचण दूर करण्यासाठी गावातील इच्छुक नागरिकांनी मदत करावी व माझ्याही नावाचा त्यात समावेश करावा, तसेच सामाजिक संघटन एन. जी. ओ. यांनीसुद्धा पुढाकार घेऊन या कुटुंबीयांची मदत करावी. प्रशासनाकडून जेव्हा मदत येईल. तेव्हा या कुटुंबीयांची मदत निश्चितच करण्यात येईल; परंतु आजघडीला घारपिंडे कुटुंबाची मदत करणे हे आपले सामाजिक दायित्व आहे, असे सांगितले. जिल्हाधिकारी यांनी खासगी मदत म्हणून आपल्याकडील रोख स्वरूपात पाच हजार रुपयांची तत्काळ मदत केली.