शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

डबघाईस आलेल्या संस्थेतील शेतकऱ्यांना जिल्हा बँकेचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2016 00:35 IST

अनेक वर्षापासून निसर्ग कोपला आहे. त्यामुळे जिल्हा संकटात ओढवला असून त्यात शेतकरी कोलमडला आहे.

सुनील फुंडे यांचा मदतीचा हात : शेतकऱ्यांना मिळणार शून्य टक्के दराने कर्ज भंडारा : अनेक वर्षापासून निसर्ग कोपला आहे. त्यामुळे जिल्हा संकटात ओढवला असून त्यात शेतकरी कोलमडला आहे. शेतकऱ्यांना कर्ज देणाऱ्या बँकांही शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. दुष्काळ सदृश्य स्थिती लक्षात घेता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी अवसायनात सापडलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना आधार देऊन संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना स्वबळावर उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.सन २०१३ मध्ये कमी कर्ज वसुलीच्या निकषाखाली शासनाने अवसायनात काढलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना आधार देऊन त्यांच्यामार्फत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा मानाने जगण्याचा अधिकार सुनिल फुंडे यांनी मिळवून दिला. आजतागायत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेतील ७४० सभासदांकडे ४०६.९७ लाख रूपयाची थकबाकी शिल्लक आहे. त्यामुळे शेतकरी सभासदांना नवीन पीककर्ज शुन्य टक्के व्याजदराने जिल्ह्यातील कोणतीही बँक उपलब्ध करून देऊ शकत नाही. या परिस्थितीची माहिती शासन व प्रशासनाला असतानाही ते काहीच करू शकले नाही. मात्र ही व्यथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांच्या लक्षात आली. त्यांनी अवसायनात आलेल्या विविध कार्यकारी सेवा संस्थाकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यासाठी त्यांनी प्रत्येक गावातील चौकाचौकात आवाहान करणारे फलक लावले. यावरच न थांबता अधिनिस्त असणाऱ्या कर्मचारी व, अधिकाऱ्यांना गावांगावात जावून सभा घेण्याविषयी सभा घेण्याचे निर्देश दिले. थकीत शेतकरी सभासदांना शासन निर्णयाप्रमाणे शुन्य टक्के व्याज दराने जिल्हा बँक कर्जपुरवठा करायला तयार आहे तेव्हा बिनव्याजी एकरी १६,५०० रूपये कर्जपुरवठा घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. अवसायान संस्थेतील शेतकरी सभासद नवीन चालू पिक कर्ज वाटपाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा ताठमानेने नवीन खरीप हंगामात उत्तम प्रकारे शेती करू शकतील असा मानसही जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. (जिल्हा प्रतिनिधी)