यावेळी मार्गदर्शन करताना सुनील फुंडे म्हणाले, जिल्हा बँकेचा निव्वळ नफा दोन कोटी ४१ लाख रुपये असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी बँक सदैव पुढे असते. गत १६ वर्षांपासून जिल्हा बँक सतत निव्वळ नफ्यात आहे. चालू वर्षी बँकेला १९५४.५३ लाख ढोबळ नफा झाला असून, त्यापैकी २४१.८० लाख निव्वळ नफा आहे. भंडारा, साकाेली, पवनी, तुमसर याठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी साक्षरता केंद्र स्थापन करण्यात आले आल्याचे त्यांनी सांगितले.
शासनाकडून २६० कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ३० सप्टेंबरपर्यंत ७४ हजार ७११ शेतकऱ्यांना ३१४१५.६४ लाख रुपयांचे पीक कर्ज वितरित केले. सर्व पीक कर्ज बँकेच्या स्वनिधीतून वाटप करण्यात आल्याचे सांगितले. आमसभेत अनेक विषयांना सर्वानुमते मंजुरी प्रदान करण्यात आली. तसेच आर्थिक वर्षातील जमा-खर्चालाही मंजुरी देण्यात आली.