शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची बँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 21:21 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची बँक आहे. शेतकऱ्यांच्या सुविधांकरिता पुढाकार घेवून एटीएम सुरू केले आहे. डिजिटलच्या जमान्यात आमचा शेतकरी तंत्रज्ञान शिकला पाहिजे, वेळेची बचत करण्यासाठी शेतकऱ्यांनी एटीएम सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनोहरभाई पटेल अकॅडमेच्या अध्यक्षा वर्षाताई पटेल यांनी सानगडी येथे केले.

ठळक मुद्देवर्षाताई पटेल : सानगडी येथे एटीएम सेवेचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची बँक आहे. शेतकऱ्यांच्या सुविधांकरिता पुढाकार घेवून एटीएम सुरू केले आहे. डिजिटलच्या जमान्यात आमचा शेतकरी तंत्रज्ञान शिकला पाहिजे, वेळेची बचत करण्यासाठी शेतकऱ्यांनी एटीएम सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनोहरभाई पटेल अकॅडमेच्या अध्यक्षा वर्षाताई पटेल यांनी सानगडी येथे केले.जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सानगडी शाखेत एटीएमच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून धनपाल उंदिरवाडे, सरीता फुंडे, उषा करपते, जनार्धन डोंगरवार, अशोक लिचडे उपस्थित होते. यावेळी बोलताना वर्षाताई पटेल म्हणाल्या, भाजप सरकार हे फसवेगिरांचे सरकार असून मोठ मोठ्या आश्वासनांची वल्गना करून अक्षश: सामान्यांचे कंबरडे मोडले आहे.अशा सरकारला धडा शिकविण्यासाठी महिलांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी बोलताना सुनील फुंडे म्हणाले, बँक शेतकऱ्यांकरिता व ग्राहकांकरिता नेहमीच सकारात्मक भूमिका घेते.ग्रामीण शाखांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेवून प्रत्येक शाखेत एटीएम सुरू करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.नवरात्रीच्या उत्सवात ११ एटीएम सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. संचालन अनिल टेंभरे यांनी केले.दिघोरीत एटीएम सेवादिघोरी (मोठी) : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दिघोरी शाखेत एटीएम केंद्राचे उद्घाटन वर्षाताई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. आता शेतकºयांना तात्काळ पैसे मिळणार आहे. यासाठी सरपंच अरुण गभणे यांनी वारंवार पाठपुरावा केला. उद्घाटन प्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, संचालक सदाशिव वलथरे, जिल्हा परिषद सदस्य माधुरी हुकरे, पंचायत समिती सदस्य गुलाब कापसे, बंडू येरणे, हंसराज रामटेके, अविनाश ब्राम्हणकर, नरेश दिवठे, माजी सरपंच शंकरराव खराबे, सोपान भेंडारकर, हिरामण देशमुख उपस्थित होते. संचालन दिपक चिमनकर यांनी केले.