शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ३० नमुने निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 05:00 IST

जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजना मिशन मोडवर निरंतर करण्यात येत आहे. जिल्ह्यात सर्वत्र लॉकडाऊन असून सोशल डिस्टन्सिंगचे कठोरपणे पालन केले जात आहे. रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात असून अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातून आतापर्यंत नागपूर मेयो रुग्णालयात तपासणीसाठी पाठविलेल्या नमुन्यांपैकी ३० नमुने निगेटिव्ह आले आहेत.

ठळक मुद्देचौघांना सुटी : आयसोलेशन वॉर्डात आठ व्यक्ती दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात सुदैवाने अद्यापपर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून नागपूर येथे पाठविलेल्या घश्यातील नमुन्यांपैकी ३० नमुने निगेटिव्ह आले आहेत. २४ व्यक्ती हॉस्पीटल क्वारंटाईन असून आतापर्यंत १८ जणांना सुटी देण्यात आली आहे. तर आठ व्यक्ती आयसोलेशन वॉर्डात दाखल आहे.जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजना मिशन मोडवर निरंतर करण्यात येत आहे. जिल्ह्यात सर्वत्र लॉकडाऊन असून सोशल डिस्टन्सिंगचे कठोरपणे पालन केले जात आहे. रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात असून अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातून आतापर्यंत नागपूर मेयो रुग्णालयात तपासणीसाठी पाठविलेल्या नमुन्यांपैकी ३० नमुने निगेटिव्ह आले आहेत. बुधवारी २३ व्यक्तींचे घशातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्याचा अद्याप अहवाल प्राप्त व्हायचा आहे.मुंबई, पुण्यासह महानगरातून १ मार्च ते १ एप्रिलपर्यंत ११ हजार ४९३ व्यक्ती जिल्ह्यात दाखल झाले आहे. त्या सर्वांनी जलद प्रतिसाद चमुने भेट देवून तपासणी केली. सध्या ११ हजार ५३० व्यक्ती होम क्वारंटाईन असून त्यात परदेशातून आलेल्या २२ व्यक्तींचा समावेश आहे. नर्सिंग वसतिगृहाच्या विलगीकरण कक्षात सध्या २४ जण दाखल आहेत. तर आतापर्यंत तेथून १८ जणांना सुटी देण्यात आली. आयसोलेशन वॉर्डात आठ जणांना दाखल करण्यात आले आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगद्वारे उपचार केले जात असून आशा सेविका घरोघरी जावून सर्वेक्षण करीत आहे. जिल्ह्यात कुठेही कोरोनाचा रुग्णा आढळून आला नसला तरी प्रभावी उपाययोजना केल्या जात आहे.स्वत:हून माहिती देण्याचे आवाहनदिल्ली येथील मरकजमध्ये सहभागी झालेले दोन व्यक्ती भंडारा जिल्ह्यात आढळून आले आहेत. त्या दोघांच्या घश्यातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. या दोघांपैकी एकाला आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले आहे. मरकजमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींनी स्वत:हून माहिती देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या