शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वन्य प्राण्यांच्या हैदोसाने नुकसानग्रस्त लाभार्थ्यांना ५.९७ लाखांचेे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:21 IST

लाखांदूर : वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे गत २०२० ते २१ या वर्षात तालुक्यात झालेल्या विभीन्न नुकसानांतर्गत सुमारे ५. ९७ लाख ...

लाखांदूर : वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे गत २०२० ते २१ या वर्षात तालुक्यात झालेल्या विभीन्न नुकसानांतर्गत सुमारे ५. ९७ लाख रुपयांचे पीडिताना वाटप करण्यात आले आहे. सदर वाटप अंतर्गत तालुक्यातील १३२ पीडित लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात आले असल्याची माहिती वन विभागांतर्गत देण्यात आली आहे.

लाखांदूर तालुक्यात गत २०२० - २१ मध्ये वन्य प्राण्यांतर्गत तालुक्‍यातील काही भागात लागवडीखालील शेतात पिकांची हानी, पशुधन हानी तर काही ठिकाणी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्याची जखमी हानी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. सदर घटनेच्या स्थानिक लाखांदूर येथील वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत पंचनामे करून पीडित लाभार्थ्यांना शासन मदत उपलब्ध होण्यासाठी प्रस्तावित करण्यात आले होते.

त्यानुसार शासनाने २०२० ते २१ या कालावधीत वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे झालेल्या विविध हानी अंतर्गत तालुक्यातील वन विभागाला सुमारे ५.९७ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. त्यानुसार सदर अनुदानाची रक्कम तालुक्यातील सुमारे १३२ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर नुकसानाच्या आधारावर अनुदान रक्कम वर्ग करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.