शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

मृतांच्या कुटुंबीयांना धनादेश वितरित

By admin | Updated: June 17, 2016 00:38 IST

तालुक्यातील परसोडी (खापरी) व गुडेगाव येथे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमांच्या कुटुंबीयांना खासदार नाना पटोले यांच्या हस्ते परसोडी खापरी येथे धनादेश वितरित करण्यात आले.

पवनी : तालुक्यातील परसोडी (खापरी) व गुडेगाव येथे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमांच्या कुटुंबीयांना खासदार नाना पटोले यांच्या हस्ते परसोडी खापरी येथे धनादेश वितरित करण्यात आले.याप्रसंगी नाना पटोले यांनी नरभक्षक वाघाचा शोध घेऊन त्याचा बंदोबस्त करण्यात येईल. उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यातील गावांचे पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने सोडविण्याचे प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन दिले, सरकारने इंग्रजाचे काळातील कायदे बदलले असल्याने प्रकल्पबाधीत गावातील जनतेला जास्तीत जासत मोबदला मिळत असल्याचे सांगितले. नरभक्षक वाघाचा बंदोबस्त होईपर्यंत नागरिकांनी लाठयाकाठ्या हातात घेवून समुहाने शेतावर जावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.याप्रसंगी आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, जि.प. समाजकल्याण सभापती निलकंठ टेकाम, माजी सभापती हंसा खोब्रागडे, तहसिलदार वासनिक, पं.स. सदस्य मनोहर आकरे, जिल्हा वनक्षेत्राधिकारी (वन्यजीव) भलावी, वनपरिक्षेत्राधिकारी डी. एम. बारई, खापरीच्या सरंपच रेखा रेहपाडे, चिचखेडाच्या सरपंच कुंदा तलमले, भाजपाचे कार्यकर्ते राजेंद्र फुलबांधे, हरिश तलमले, डॉ. संदीप खंगार, राजेश येलशेट्टीवार, सुरेश अवसरे, विवेक अवचट, के. डी. मोटघरे यावेळी उपस्थित होते. मृतक रुपचंद माटे यांच्या पत्नी मनिषा रुपचंद माटे यांना ९० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. घटनेच्या दिवशी १० हजार रुपये तातडीची मदत देण्यात आलेली होती. उर्वरित रक्कम ७ लाख रुपये मुदत ठेवीच्या स्वरुपात देण्यात येणार आहे. गुडेगाव येथील वाघाचे हल्ल्यात जखमी झालेल्या बुध्दम ठवरे यांची पत्नी शालुबाई मुलगा भगवान व ज्योतिष तसेच मुलगी सुकेशिनी यांना ७ लाख रुपयांचे मुदत ठेव प्रमाणपत्र विभागून देण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)