शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिहोरा येथे दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 22:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : वैनगंगा व बावनथडी नद्यांचे खोऱ्यात असणाऱ्या सिहोरा परिसरातील नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. सुकळी आणि येरली प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद करण्यात आल्याने नागरिकांवर गढूळ पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.सिहोरा परिसरात असणाऱ्या नद्यांचे पात्रात पुराचे पाणी गढूळ आहे. हे पाणी शुद्धीकरणासाठी सुकळी व येरली प्रादेशिक ...

ठळक मुद्देनद्यांच्या पात्रात गढूळ पाणी : पाण्याचे स्त्रोतही खराब

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : वैनगंगा व बावनथडी नद्यांचे खोऱ्यात असणाऱ्या सिहोरा परिसरातील नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. सुकळी आणि येरली प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद करण्यात आल्याने नागरिकांवर गढूळ पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.सिहोरा परिसरात असणाऱ्या नद्यांचे पात्रात पुराचे पाणी गढूळ आहे. हे पाणी शुद्धीकरणासाठी सुकळी व येरली प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आलेल्या आहेत. अनेक वर्षापूर्वीपासून सुकळी गावाची योजना रखडली आहे. तर येरली प्रादेशिक पाणी पुरवठा योजना थंडबस्त्यात आहे. सिहोरा गावात एकमात्र ही योजना सुरु आहे. दरम्यान सलग्नीत गावात स्वतंत्र नळ योजना सुरु करण्यात आलेल्या आहेत. या नळ योजनांना जलशुद्धीकरण केंद्र नाही. यामुळे याच गढूळ पाण्याने नागरिकांना पाण्याची तहान भागवावी लागत आहे. दरम्यान येरली प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद झाली. या योजनेचे अभिनव टाकीत पाणी पुरवठा करण्यासाठी मोहगावचे (खदान) सरपंच उमेश कटरे यांची निर्णय घेत गावागावातच पाण्याचे स्त्रोत निर्माण केले आहे. या नवीन स्त्रोताने गावकऱ्यांना काही महिने मोठा दिलासा मिळाला आहे.गावात दोन पाणी पुरवठा योजना असल्याने उन्हाळ्यातही पाणी टंचाई जाणवली नाही. परंतु पावसाळा लागताच स्त्रोताचे चित्र गडगडले आहे. या स्त्रोतामधून गढूळ पाणी येत असल्याने गावकरी हैराण झाले आहेत. गावात गावकºयांना काळ्या पाण्याची सजा असे चित्र दिसून येत आहे. गढूळ पाण्याचे झरे सुरु झाल्याने याचा शोध घेतला जात आहे.परिणामत: गावकºयांना पिण्याचे पाणी बाहेरून आणावे लागत आहे. मोहगाव (खदान) गावात दुषित पाण्याने गावकºयांची झोपच उडाली आहे. नद्यांचे काठावरील पाणी पुरवठा करणाºया योजना मधून पिण्याचे उपलब्ध होत आहेत. गावकरी तथा शाळा व अंगणवाडींनाच याच पाण्याच पुरवठा होत आहे.बालकांना शुद्ध पाणी पुरवठा व शालेय, आरोग्य परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती धनेंद्र तुरकर यांनी सिहोरा परिसरात आढावा बैठकीचे आयोजन केले आहे. अंगणवाडी, शाळा, आरोग्य व गावात पावसाळ्यात आरोग्याची काळजी विषयक, पिण्याचे पाणी आदी विषयावर चर्चा होणार आहे. काही गावात गढूळ पाणी पुरवठ्याचे संकट ओढावले असल्याने या आढावा बैठकीकडे लक्ष लागले आहे.पावसाळ्यात अंगणवाडी, शाळा व गावात पाण्याचे नियोजन, शुद्ध पाणी, स्वच्छता आदी महत्वपूर्ण आहेत. याकरिता आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.-धनेंद्र तुरकर, सभापती, जि.प. भंडारा.मोहगाव (खदान) गावात पाणी पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र पाण्याचे स्त्रोत आहेत. अचानक या स्त्रोतांना गढूळ पाणी येत असल्याने त्याचा शोध घेतला जात आहे. दोन तीन दिवसात स्थिती सुधारेल.-उमेश कटरे, सरपंच मोहगाव (ख.)