शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा मुख्य जिल्हा बसस्थानकाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 23:01 IST

जिल्ह्यातील मुख्य बसस्थानक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. खड्डेच खड्डे, पार्किंगची अव्यवस्था, सुरक्षेचा अभाव आहे. दुर्गंधी व कचऱ्यामुळे समस्येत अजून वाढ झाली आहे. आगार प्रशासन या समस्येकडे लक्ष देईल काय, असा प्रश्न प्रवासी विचारीत आहेत.

ठळक मुद्देदुर्गंधीमुळे रहदारीवर परिणाम : राज्य परिवहन आगाराचे दुर्लक्ष

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील मुख्य बसस्थानक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. खड्डेच खड्डे, पार्किंगची अव्यवस्था, सुरक्षेचा अभाव आहे. दुर्गंधी व कचऱ्यामुळे समस्येत अजून वाढ झाली आहे. आगार प्रशासन या समस्येकडे लक्ष देईल काय, असा प्रश्न प्रवासी विचारीत आहेत.जिल्ह्यातील सर्वात मोठे बसस्थानक म्हणून भंडारा बसस्थानकाची ओळख आहे. विशेष म्हणजे जिल्हयाचे मुख्यालय असल्याने अनौपचारिकपणे बसस्थानकाचे क्षेत्रफळ मोठे असणे स्वाभाविक आहे. बसस्थानकाची निर्मिती झाल्यानंतर जुन्या बसस्थानक परिसरात सुरक्षेची व स्वच्छतेची काळजी घेण्यात आली नाही. बसस्थानकाच्या उत्तर पूर्व दिशेला कांजीहाऊस आहे. पश्चिम दिशेला भंडारा तुमसर हा राज्य मार्ग आहे. दक्षिण दिशेला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकूल व जलतरण तलावाचा परिसर आहे.पूर्व दिशेला झोपडपट्टीचा परिसर आहे. नविन बसस्थानकाची निर्मिती झाल्यानंतर जुना बसस्थानकाच्या परिसरातून मोठ्या बाजारात जाण्यासाठी एक लहान गल्ली होती. याच गल्लीतून मोठा बाजार परिसरातून येणारे प्रवासी आजही येतात. मात्र या परिसरात दुर्गंधी आहे. कचरा अस्तव्यस्त फेकलेला दिसून येतो. बसस्थानक आवारालगत व्यापारी संकुलाची भव्य इमारत आहे. त्यामुळे जुन्या बसस्थानकाचा भाग खुला असला तरी दाबल्या गेला आहे. शेळ्या, कुत्रे व अन्य बेवारस जनावरे येथे फिरत असतात. बसस्थानकाच्या आवरात खुलेआम लघुशंकेसाठी करण्यासाठी वापर करण्यात येतो. त्यामुळेही दुर्गंधीत वाढ झाली आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य प्रमाणात नालीचे बांधकाम नाही. उघड्यावरच लघूशंका केली जात असल्याने येथून जाणाºया प्रवाशांना तोंडावर रुमालच घेवून जावे लागते. काही दिवसांपूर्वी स्वच्छता करण्यात आली होती, मात्र स्थिती ‘जैसे थे’ आहे. बसस्थानक परिसराला लागून असलेल्या इमारती व अन्य दूकानांमधील कचरा कचरापेटीत न घालता तो थेट जुन्या बसस्थानक परिसरात फेकला जातो. विशेष म्हणजे बसस्थानक परिसरातील डांबरीकरण उखडले असल्याने या समस्येत अजून भर पडली आहे. गिट्टी उखडलेली असल्याने बसच्या चाकाखाली सापडून गिट्टी केव्हा प्रवाश्यांच्या अंगावर येईल याचा नेम नाही. मध्यंतरी आगार प्रशासनाने भरण घालून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला होता. बसस्थानकाच्या दोन्ही प्रवेशव्दारावरील रस्त्याची वर्षातून अनेकदा डागडूजी करण्यात येते. मात्र समस्या सुटता सुटत नाही. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची गरज आहे. मागील वर्षी दोन्ही प्रवेश दारावर लोखंडी कठडेयुक्त रॅलींगची निर्मिती करण्यात आली.प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावरबसस्थानकात प्रवाशांची नेहमी गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी अनेकदा 'हात की सफाई' केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी येथे पोलीस चौकीची स्थापना करण्यात आली. मात्र त्यांची समस्या सोडविण्यात पोलीसांना यश नाही. येथील पोलीस चौकी नेहमीच कुलुपबंद अवस्थेत दिसून येते. बसस्थानक व आवारात अनेकदा बेवारस साहित्य तासनतास पडून असते. मात्र त्याची साधी चौकशी केली जात नसल्याचे समजते. दहा दिवसांपूर्वी पालांदुरातील एका महिला प्रवाशाला एक लक्ष रूपये किंमतीच्या दागिण्यांना मुकावे लागल होते. पोलिस चौकशी कक्ष कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होतो.पे्रमीयुगुलांचे थांबेजिल्हा मुख्यालयी असलेल्या बसस्थानकात दररोज येणाऱ्यांची संख्या हजारावर आहे. याठिकाणी बहुतांश युवायुवतींचे जत्थे दिसून येतात. शालेय विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते. बसस्थानक जणू प्रेमीयुगलांचे थांबे असल्याचे तेथील हालचालीवरुन समजते.