शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

पोलीस प्रशासनाकडून ज्येष्ठ नागरिकांची अवहेलना

By admin | Updated: November 19, 2016 00:36 IST

सुमारे २० वर्षापुर्वी महसूल विभागाकडून नाममात्र एक रूपया भाडे तत्वावर पोलीस विभागाला जागा सुपूर्द करण्यात आली.

पंतप्रधानांना केली तक्रार : चैतन्य पोलीस मैदानावर फिरण्यासाठी फी चा तगादाभंडारा : सुमारे २० वर्षापुर्वी महसूल विभागाकडून नाममात्र एक रूपया भाडे तत्वावर पोलीस विभागाला जागा सुपूर्द करण्यात आली. मात्र या मैदानावर फिरायला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसह अन्य व्यक्तींकडून फिरायसाठी पैसे द्यावे, असा तगादा लावण्यात येत असून प्रशासनाने गणेशपूर मार्गावरील गेटला कुलूप लावल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. याची तक्रार ज्येष्ठ नागरिकांनी जिल्हाधिकारीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद मोदी यांना केली आहे.महसूल विभागाच्या अखत्यारीतील मोकळी जागा सुमारे २० वर्षापुर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला देण्यात आली होती. या जागेचे नाममात्र एक रूपया भाडे वसूल करण्यात येते. या मैदानाचा वापर पोलीस प्रशासनाकडून खेळाचे मैदान, कवायती मैदान, पोलीस भरती व अन्य कामांसाठी केला जातो. त्या जागेवरील काही भागात पोलीस प्रशासनाने चैतन्य पोलीस मैदान तयार केले. सुमारे दोन हजार स्वे. फूट जागेवर इमारत बांधून तिथे जीम तयार करण्यात आले आहे. तेव्हापासून परिसरातील ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसह सर्व सामान्य नागरिकही सकाळ व सायंकाळी फिरायला जातात. दरम्यान तत्कालीन पोलीस अधीक्षक आरती सिंग यांनी ज्येष्ठ नागरिकांकडून ३० रूपये व अन्य नागरिकांकडून ५० रूपये मासिक वर्गणी घेणे सुरू केले. याला नागरिकांनी विरोध केला होता. मात्र प्रशासनापुढे नागरिकांचे चालले नाही. १ नोव्हेंबरपासून पोलीस प्रशासनाने चैतन्य कवायत मैदानावर सकाळ व सायंकाळी फिरायला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसह सर्व व्यक्तींकडून अवाढव्य फी आकारण्याचा बोर्ड प्रवेश द्वारासह मैदानाच्या चारही बाजुला लावला. यात मासिक वर्गणी म्हणून ६० वर्षावरील सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांकडून १०० रूपये, ६० वर्षावरील इतर खाजगी व्यक्तीकडून ५० रूपये तर ६० वर्षाखालील सर्व व्यक्तींकडून २०० रूपये आकारण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मासिक वर्गणी न देणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, अशी तंबीही या नोटीस बोर्डवर प्रशासनाने लावल्याचा आरोप ज्येष्ठ नागरिकांनी दिलेल्या निवेदनातून केला आहे. पोलीस प्रशासनाने एवढ्यावरच न थांबता गणेशपूरकडून जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवेश द्वाराला कुलूप लावून मार्ग बंद केल्याचा आरोपही आहे. केवळ नाममात्र एक रूपया भाडे तत्वावर घेतलेल्या जमिनीवर फिरण्याकरीता जाणाऱ्या व्यक्तींची पैशाच्या माध्यमातून लुबाडणूक होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून पोलीस प्रशासनास योग्य कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावे व फी बंद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देणाऱ्यांमध्ये एस.के. गाढवे, एच.एन. गजभिये, ए.टी. चवरे, के.एम. मदारकर, टी.बी. निपाने, जी.एस. महाकाळकर, डब्ल्यु. एम. चकोले, श्रीराम सोनकुसरे, एन.के. मेहर, डॉ. महेंद्र गणवीर यांच्यासह अन्य नागरिकांचा समावेश आहे. (शहर प्रतिनिधी)