शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

‘अस्मिता’साठी शाळांमध्ये विषमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 22:37 IST

समान शिक्षणाचा डंका पिटणाऱ्या शासनाने अस्मिता योजनामध्ये जिल्हा परिषद व खाजगी शाळांमधील मुलीबाबत विषमतेची बीजे पेरली आहेत. मुलींमध्ये पक्षपात करुन खाजगी शाळांच्या मुलींचा आत्मसम्मानाला ठेच पोहचविण्याचे साहस महाराष्ट्र शासनाने केले आहे.

ठळक मुद्देमुलींच्या आत्मसन्मानाला ठेच : समानतेच्या भावनेचा देखावा

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : समान शिक्षणाचा डंका पिटणाऱ्या शासनाने अस्मिता योजनामध्ये जिल्हा परिषद व खाजगी शाळांमधील मुलीबाबत विषमतेची बीजे पेरली आहेत. मुलींमध्ये पक्षपात करुन खाजगी शाळांच्या मुलींचा आत्मसम्मानाला ठेच पोहचविण्याचे साहस महाराष्ट्र शासनाने केले आहे.किशोरवयीन मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकीन व वैयक्तिक स्वच्छतेबाबत जाणीव जागृती निर्माण करुन मुलींना माफक दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करुन देणारी अस्मिता योजना आंतरराष्ट्रीय महिला दिनाला महाराष्ट्र शासनाने सुरु केली आहे. तथापि, अस्मिता योजनेत केवळ जिल्हा परिषद शाळेतील मुलींनाच सहभागी करण्यात आले आहे. त्यामुळे खाजगी शाळेत शिक्षण घेणाºया मुली अस्मिता योजनेपासून वंचित राहणार आहेत. खाजगी शाळांतील विद्यार्थ्यांना पाठयपुस्तक, माध्यान्ह भोजन, विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती, शिक्षकांचे वेतन शासनाकडून दिले जाते. सर्वांना समान शिक्षणाची संधी, शैक्षणिक विषमता दूर करण्याचे उत्तरदायीत्व शासनाचे आहे. तथापि, अस्मिता योजनेमध्ये जिल्हा परिषद व खाजगी शाळा यामध्ये शिक्षण घेणाºया मुलींमध्ये फरक दाखविण्याची शासनाने हिंमत करुन खाजगी शाळांच्या मुलींच्या अस्मितेला दुखावले आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थीनीमध्ये मासिक पाळी दरम्यान स्वच्छता विषयाबाबतची जागरुकता कमी बघावयास मिळते. वैयक्तिक स्वच्छताबाबत जाणीव मोठ्या प्रमाणात यावी, यासाठी अस्मिता योजनेद्वारे जिल्हा परिषद शाळेतील ११ ते १९ वयोगटातील मुलींचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हा परिषद शाळेतील मुलींना सॅनिटरी नॅपकीन ५ रुपयात दिली जाणार आहे. त्या पॅकेटमध्ये आठ 'पॅड' असणार आहेत. जिल्हा परिषद शाळेतील ११ ते १९ वयोगटातील मुलींसाठी ही योजना प्राथमिक शिक्षण विभागाच्या (जिल्हा परिषद) मदतीने राबविण्यात येणार आहे. प्रत्येक किशोरवयीन मुलींचे नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्राचे मदतीने अस्मिता योजनेत नोंदणी करणे सुरु आहे. नोंदणी झालेल्या मुलींनाच अस्मिता कार्ड दिला जाईल. अस्मिता कार्ड शाळांमध्ये उपलब्ध करुन दिले जातील.तसेच अस्मिता योजना ग्रामीण भागातील महिलांसाठी सुध्दा आहे. ग्रामीण भागातील महिलांना दोन आकाराचे 'पॅड'चे पॉकीट २४ रुपये व २९ रुपये या किंमतीला दिले जाणार आहेत. ग्रामीण भागातील महिलांसाठी स्वयंसहायता बचत गटामार्फत अस्मिता योजना राबविण्यात येत आहे. स्वयंसहायता गटाने अस्मिता अ‍ॅपद्वारे नोंदणी केल्यानंतर एका महिलेला सॅनिटरी नॅपकीनचा व्यवसाय करता येईल. त्यासाठी तीन हजार रुपये भरुन नॅपकिनची मागणी करता येणार आहे.सॅनिटरी नॅपकिन वापरण्याबाबतचे प्रबोधन व वैयक्तिक स्वच्छतेचे महत्व करुन देणारी योजना असमानतेच्या मनोवृत्तीमुळे शासनाचा हेतू पूर्ण करण्यास मदत करेल. याबाबत आतापासूनच शंका निर्माण केल्या जात आहेत. मुलगी शिकवा, हा संदेश दिला जातो, मात्र दुसरीकडे जि.प. व खाजगी शाळा यामध्ये भेद निर्माण करुन शासन मुलींबाबत तोडगा विचार करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. या अस्मिता योजनेच्या विषमतेच्या दरीमुळे मुली-मुलींमध्ये नकारात्मक विचाराची गुंफन तयार करण्याचे काम केले जात आहे.भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खाजगी शाळांची संख्या अधिकच आहे. मोहाडी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ४८ व खाजगी २५ शाळा आहेत. त्यामुळे तालुक्यातील २५ शाळांमधील मुली अस्मिता योजनेपासून दुर राहणार आहेत.मोहाडी तालुक्यात ९०० मुलींची नोंदणीअस्मिता योजनेत पात्र लाभार्थी मुलींची नोंदणी प्रक्रिया संथगतीने होत आहे. आतापर्यंत केवळ मोहाडी तालुक्यात ९०० मुलींची नोंदणी करण्यात आली आहे.अस्मिता अ‍ॅपद्वारे स्वयंसहायता समुह यांनी आतापर्यंत १०५५ महिला बचत गटापैकी १५६ गटांनी नोंदणी केली आहे. सॅनिटरी नॅपकीनपुरवठा करण्यासाठी एकाही महिलानी तीन हजार भरण्यासाठी पुढाकार घेतला नाही.खाजगी शाळांमधील किशोरवयीन मुलींवर हा अन्यायच आहे. खाजगी/ जिल्हा परिषद असा फरक करुन मुलींच्या कोवळ्या मनावर पक्षभेदाची भावना रुजविणे सामाजिक हिताचे नाही.यशोदा येळणे, प्राचार्यस्व. चिंतामन बिसेन महाविद्यालय मोहाडी