लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लाखनी तालुक्यातील पालांदूर ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. गावात स्वच्छता अभियानासह निर्जंतुकीकरण मोहीम राबविली जात आहे. ध्वनीक्षेपकावरुन गावात प्रबोधन केले जात असून यासाठी ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी पुढाकार घेतला आहे.पालांदूरचे सरपचं पंकज रामटेके, उपसरपंच हेमराज कापसे यांच्या पुढाकारात ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. गावात पाण्याने तुंबलेल्या नाल्यांची स्वच्छता करण्यात आली. निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करण्यात आली. गावातील पशुवैद्यकीय दवाखाना, हातपंप परिसर, बाजार समिती परिसर, गावातील विविध ठिकाणी फवारणी करण्यात आली. गावातील आशा वर्कर, पोलीस पाटील, ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रतिष्ठीत नागरिक यासाठी पुढे आले आहे. शासनाच्या आदेशांचे पालन करीत कोरोना युध्द जिंकण्यासाठी प्रत्येकाने कंबर कसली आहे.ठाणेदार अंबादास सुणगार व त्यांचे १४ सहकारी अहोरात्र गावात गस्त घालीत आहेत. सी-६० चे कमांडो पथकाने पथसंचलन करुन प्रत्येकाला संचारबंदीच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन केले. गावकऱ्यांनी कोरोनाच्या युध्दात सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले.गावकऱ्यांचा सहभागपालांदूर येथे स्वच्छता मोहीमेत गावकरी सहभागी झाले असून कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येकांनी निर्धार केला आहे. शासनाच्या सूचनाचे तंतोतंत पालन करुन सोशल डिस्टन्सिंग राखले जात आहे. तरुणाई यात पुढे आहे.
पालांदूर येथे निर्जंतुकीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST
गावातील पशुवैद्यकीय दवाखाना, हातपंप परिसर, बाजार समिती परिसर, गावातील विविध ठिकाणी फवारणी करण्यात आली. गावातील आशा वर्कर, पोलीस पाटील, ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रतिष्ठीत नागरिक यासाठी पुढे आले आहे. शासनाच्या आदेशांचे पालन करीत कोरोना युध्द जिंकण्यासाठी प्रत्येकाने कंबर कसली आहे.
पालांदूर येथे निर्जंतुकीकरण मोहीम
ठळक मुद्देध्वनीक्षेपकावरुन प्रबोधन : ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा पुढाकार