शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

उमेदवारांना बसणार असंतुष्टांचा फटका

By admin | Updated: June 24, 2015 01:13 IST

जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या सात पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाला केवळ दहा दिवस शिल्लक आहेत.

भंडारा : जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या सात पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाला केवळ दहा दिवस शिल्लक आहेत. असे असले तरी भाजप व्यतिरिक्त काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप संपूर्ण उमेदवारांची यादी घोषीत केलेली नाही. त्यामुळे उमेदवारी मिळणार की नाही या संभ्रमात उमेदवार आहेत. काँग्रेसने उमेदवारी नाकारली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारी लढण्यासाठी काही जण इच्छूक आहेत. काँग्रेसचा आलेख राष्ट्रवादी काँग्रेसनेही काही ठिकाणचे बी फार्म रोखून ठेवले आहे. असे असले तरी ज्यांनी निवडणुकीची तयारी करुन नामांकन दाखल केले आहे ते निवडणूक लढणार असल्यामुळे या निवडणुकीत सर्वच पक्षातील उमेदवारांना असंतुष्ठांचा फटका बसणार आहे.खरीपाच्या हंगामाला सुरुवात झालेली असताना जिल्हा परिषद निवडणूक आल्यामुळे या निवडणुकीच्या धामधुमीत पाहिजे तेवढा उत्साह ना मतदारांमध्ये आहे ना कार्यकर्त्यांमध्ये दिसत नसल्याचे चित्र आहे. लोकसभा आणि विधानसभेतील विजयानंतर भाजपमध्ये उमेदवारांची रांगच रांग होती. त्यामुळे कोण उमेदवार निवडून येऊ शकतो, या भर देत उमेदवारी जाहीर केले आहे. असे असले तरी उमेदवारी वाटपात सामाजिक संख्याबळामुळे काहींच्या उमेदवारी कापण्यात आल्याचा प्रकार भाजपासह काँग्रेस पक्षात दिसून आला. सामाजिक संख्या बळामुळे एखादा उमेदवार जिल्हा परिषदेत निवडून आला तर पाच वर्षांनंतर येणाऱ्या निवडणुकीत तो डोके वर काढू शकतो, या भीतीमुळे विद्यमान लोकप्रतिनिधींनी समोर राजकारण डोळ्यासमोर ठेऊन खेळी आखलेली आहे. आजचे राजकारण हे उद्याचे भवितव्य असल्याची त्यांना जाणीव आहे. तुमसर तालुक्यात एका उच्चविद्याविभूषित वकीलाने काँग्रेसची उमेदवारी मागितली होती. परंतु, उमेदवारी कापण्यात आली. त्यामागेही पक्षाचा उमेदवार पडला तरी चालेल, परंतु वकीलाला उमेदवारी द्यायची नाही, हाच निकष लावण्यात आल्याची चर्चा आहे. सध्याच्या राजकीय समीकरणात जिल्हा परिषद निवडणुकीत कोण बाजी मारणार, हे चित्र अस्पष्ट आहे. जातीय समीकरणाच्या आधारावर मतांचे विभाजन होणार असले तरी लोकसभा, विधानसभा निवडणुकीची लाट निष्प्रभ ठरण्याची शक्यता अधिक आहे. (जिल्हा प्रतिनिधी)