शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने वाहनधारकांमध्ये असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:06 IST

कमी वेळात झटपट कामे व्हावीत, या हेतूने शहरी भागासह ग्रामीण भागातील लोकांनी दुचाकी व चारचाकी वाहने खरेदी केली आहेत. पूर्वीच्या तुलनेत आता पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. पेट्रोल डिझेलचे दर सरकारने नियंत्रणमुक्त केल्यापासून बहुतांश वेळा त्यात केवळ वाढच झाली आहे.

ठळक मुद्देसरकारवर रोष : ग्रामीण भागातील वाहनधारकांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कमी वेळात झटपट कामे व्हावीत, या हेतूने शहरी भागासह ग्रामीण भागातील लोकांनी दुचाकी व चारचाकी वाहने खरेदी केली आहेत. पूर्वीच्या तुलनेत आता पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. पेट्रोल डिझेलचे दर सरकारने नियंत्रणमुक्त केल्यापासून बहुतांश वेळा त्यात केवळ वाढच झाली आहे.आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी साध्या पेट्रोलचा दर प्रती लिटर ८२.०२ रुपये, पॉवर पेट्रोलचा दर प्रती लिटर ८४.७७ रुपये व डिझेलचा दर प्रती लिटर ६८.२८ रुपये लागू करण्यात आला आहे. पेट्रोल व डिझेलची भरमसाठ दरवाढ झाल्याने सर्वसामान्य व ग्रामीण भागातील वाहनधारकांमध्ये सरकार विरोधात संताप व्यक्त होत आहे.केंद्र शासनाच्या भारतीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या अखत्यारित सर्व पेट्रोल कंपन्या येतात. वर्षभरात केंद्र शासनाने पेट्रोलच्या भावात अनेकदा वाढ केली आहे. या पेट्रोल दरवाढीविरोधात विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी आंदोलने करून शासनाचा निषेध केला होता. मात्र त्यानंतरही केंद्र शासनाची पेट्रोल डिझेलची दरवाढ कायमच आहे. पेट्रोलप्रमाणेच इतर वस्तूंची भाववाढ झाली आहे. पेट्रोलची दरवाढ होत असल्याने गेल्या तीन ते चार महिन्यांपासून नव्याने दुचाकी घेणाºया वाहनधारकांचाही दुचाकीबाबतचा कल बदलला आहे. आता अधिकाधिक एवरेज देणाºया गाड्यांची खरेदी होताना दिसून येत आहे. कमी पेट्रोलमध्ये अधिकाधिक अंतर धावणाºया दुचाकी खरेदीकडे लोकांचा कल वाढला आहे.ग्रामीण भागात इंधनाची दुपटीने विक्रीबहुतांश ग्रामीण भागात पेट्रोलपंप नाही. त्यामुळे ग्रामीण भागात पेट्रोलचे किरकोळ विक्रेते आता लिटरमागे १०० पेक्षा अधिक पैसे घेत आहेत. ग्रामीण भागातील काही दुकानदार ११० ते १२० रुपये लिटर मागे घेत आहे. ग्रामीण भागात पेट्रोल मिळत नसल्याने वाहनधारकांना पेट्रोल दरवाढीचा फटका सातत्याने सहन करावा लागत आहे.दररोज सुरु आहे दरवाढभंडारा शहरातील एका पेट्रोलपंपावर दरवाढीबाबत विचारणा केली असता, गेल्या काही महिन्यांपासून आता दररोज पेट्रोलच्या भावात पाच ते दहा पैशांची वाढ होत असल्याची माहिती पेट्रोलपंपावरील कामगारांनी दिली. सध्या साधा पेट्रोल ८२.०२ व पॉवरचा पेट्रोल प्रती लिटर ८४.७७ तर डिझेलचे प्रति लिटर दर ६८.२८ रुपये दर सुरू आहे.