शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्द प्रकल्पातून दहा दिवसात ११४० दलघमी पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 05:00 IST

गतवर्षी महापुराला कारणीभूत ठरलेल्या या प्रकल्पाचे पाणी यंदा नियंत्रितपद्धतीने सोडण्यात येत आहे. २३ जुलै रोजी सर्वप्रथम या प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले होते. तेव्हापासून दरारोज या प्रकल्पाचे दरवाजे कमी जास्त संख्येत उघडण्यात येत आहे. २ ऑगस्ट रोजी या प्रकल्पाचे ११ दरवाजे ११ मीटरने उघडण्यात आले होते. त्यातून ११९२ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यासोबतच डाव्या कालव्यातूनही पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

ठळक मुद्देजलस्तर नियंत्रणासाठी उपाय : प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने प्रकल्पाचा जलस्तर कायम ठेवण्यासाठी पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. गत दहा दिवसात प्रकल्पाचे दरवाजे उघडून ११४० दलघमी पाणी सोडण्यात आले. वैनगंगा नदी आणि गोसेखुर्द प्रकल्पाचा जलस्तर पावसाळ्यात वाढत आहे. गतवर्षी महापुराला कारणीभूत ठरलेल्या या प्रकल्पाचे पाणी यंदा नियंत्रितपद्धतीने सोडण्यात येत आहे. २३ जुलै रोजी सर्वप्रथम या प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले होते. तेव्हापासून दरारोज या प्रकल्पाचे दरवाजे कमी जास्त संख्येत उघडण्यात येत आहे. २ ऑगस्ट रोजी या प्रकल्पाचे ११ दरवाजे ११ मीटरने उघडण्यात आले होते. त्यातून ११९२ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यासोबतच डाव्या कालव्यातूनही पाण्याचा विसर्ग केला जात आहे. दहा दिवसात तब्बल ११४० दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. भंडारा-नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दोन लाख ५० हजार ८०० हेक्टर जमीन सिंचनाची क्षमता या प्रकल्पाची आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पातील जलसाठा २४३.११ मीटर असून पाण्याची टक्केवारी ४०.५९ टक्के आहे. गोसे गावाजवळ बांधण्यात आलेल्या या प्रकल्पाची लांबी ११.३५ किमी असून उंची २२.५ मीटर आहे. पाणी साठवण क्षमता ११४६ दलघमी आहे. सद्यस्थितीत ३०३ दलघमी पाणीसाठा असतानाही पूर परिस्थिती उद्भवू नये म्हणून या प्रकल्पाचे पाणी नियंत्रित केले जात आहे.

पुनर्वसनाचा प्रश्न कायम- गोसे प्रकल्पामुळे बाधित झालेल्या काही गावांचे पुनर्वसन अद्यापही प्रलंबित आहे. त्यामुळे हा प्रकल्प १०० टक्के क्षमतेने भरला जात नाही. त्यामुळेच या प्रकल्पात ४० टक्के पेक्षा अधिक पाणी संग्रहीत केले जात नाही. गोसेप्रकल्पाचे पाणी सोडल्यानंतर वैनगंगा दुथडी भरून वाहत आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.कारधा येथे वैनगंगा पातळी इशारा पातळीपेक्षा कमी- भंडारा शहराजवळून वाहणाऱ्या वैनगंगा नदीची सोमवारी २४३.१२ मीटर पातळी मोजण्यात आली होती. येथे इशारा पातळी २४५ मीटर आणि धोका पातळी २४५.५० मीटर आहे. सद्यस्थितीत इशारा पातळीपेक्षा कमी पाणी आहे. मात्र लहान पुलाच्या मोऱ्या वैनगंगा दुथडी असल्याने बुजल्या आहेत. प्रशासनाने पुलावरील सुरक्षा कठडे काठले असून नागरिकांनी सावध रहावे, अशा सूचना दिल्या आहे.

 

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प