शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 06:00 IST

आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील नियोजनाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांची इन्सिडेंट कमांडर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद मोटघरे यांना सनियंत्रक म्हणून घोषीत करण्यात आले. याअनुषंगाने सर्व शासकीय विभागाच्या जबाबदाऱ्या अधिकाऱ्यांसाठी आदेशीत केले आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संपूर्ण जगाला हादरवून सोडणाºया कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, संसयीत रुग्णांमुळे आपत्तीची स्थिती उद्भवू नये यासाठी जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती प्राधीकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी शुक्रवारी आदेश जारी केले आहेत.आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील नियोजनाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांची इन्सिडेंट कमांडर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद मोटघरे यांना सनियंत्रक म्हणून घोषीत करण्यात आले. याअनुषंगाने सर्व शासकीय विभागाच्या जबाबदाऱ्या अधिकाऱ्यांसाठी आदेशीत केले आहेत.यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक व अधिनस्त अधिकाऱ्यांद्वारे परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती संकलीत करणे, हॉटेल व नातेवाईकांकडे मुक्काम आहे त्यांची माहिती एकत्रित करून जिल्हा रुग्णालय व संबंधित पोलीस ठाण्याला द्यावी लागणार आहे. गर्दीच्या ठिकाणी स्वयंसेवी संस्थाच्या सहकार्याने कोरोनाविषयी जनजागृती करणे, गर्दीचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याविषयी आयोजकांना अवगत करणे, अधिनस्त कर्मचाºयांना प्रशिक्षण व मार्गदर्शन करून जिल्हा रुग्णालयाशी समन्वय ठेवण्याचे निर्देश आहे.जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाºयांना लघुकृती प्रमाणित कार्यपद्धत तयार करण्याबाबत निर्देश दिले आहे. आरोग्य विभागाने मार्गदर्शक पुस्तकाचे वितरण करावे, स्वतंत्र वैद्यकीय पथक पूर्णवेळ तयार ठेवावे, संशयीत रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची व्यवस्था करावी, आवश्यक औषध साठा उपलब्ध करावा, कोरोंटाइन व आयसोलेशन युनिट स्थापन करून स्वतंत्र न्युडल अधिकाºयांची नियुक्ती करावी. तसेच दैनंदिन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे निर्देश दिले आहे. यासोबतच नगरपरिषद, नगरपंचायतच्या नगरप्रशासन अधिकारी, सर्व मुख्याधिकारी यांना जनजागृती करण्याचे निर्देश दिले आहेत. वॉर्डनिहाय स्वच्छता ठेवण्याची सूचना आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अधिनस्त प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत जनजागृती करण्याबाबत सूचीत केले आहे. स्वतंत्र वैद्यकीय पथक व नोडल आॅफिसरची नियुक्ती करून अंगणवाडी व शाळांमध्ये प्रबोधन करण्याबाबतही निर्देश दिले आहेत. सध्या जिल्ह्यात कुठेही कोरोनाचा संसर्ग झाला नसला तरी शासकीय यंत्रणा मात्र यासाठी सज्ज आहे.औषधांची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाईऔषध विक्रेत्यांनी जादा दराने मांस व औषधांची विक्री केली. अथवा साठेबाजी केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन, जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. वेळोवेळी सर्व औषध विक्रेत्यांची तपासणी करावी व त्यांच्यासोबत समन्वय बैठक घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.खासगी डॉक्टरांच्या सेवेचे अधिग्रहणया कायद्यांन्वये खाजगी डॉक्टरांची सेवा अधिग्रहीत करणे तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये साधनसामृगी अधिग्रहीत करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहे. सूचनांचे पालन न करणाऱ्या व्यक्तीस ५१ अन्वये कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.टोल फ्री क्रमांक कार्यान्वितकोरोना आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत टोल फ्री क्रमांक कार्यान्वीत करण्यात आले आहे. राज्यस्तरीय नियंत्रण कक्षाचा ०२०-२६१२७३९४ व राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक ०११-२३९७८०४६ या क्रमांकाची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी यांना निर्देश दिले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना