शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

सोयीसुविधांअभावी भाविकांची गैरसोय

By admin | Updated: May 5, 2016 00:58 IST

केंद्र व राज्य शासनाने पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलेल्या भंडारा जिल्ह्यातील प्राचीन पवनी नगरात, भगवाननगर येथे एक भव्य साईमंदिर जागृत देवस्थान आहे.

पवनी पर्यटनस्थळ परिसर : साईभक्तांची व्यथापवनी : केंद्र व राज्य शासनाने पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलेल्या भंडारा जिल्ह्यातील प्राचीन पवनी नगरात, भगवाननगर येथे एक भव्य साईमंदिर जागृत देवस्थान आहे. सदर साईमंदिर अनेकांच्या सहकार्यातून पवनीतील एका मोठ्या सुप्रसिद्ध कुऱ्हाडा तलावाच्या काठावर मागीलव् ार्षी निर्माण करण्यात आले होते. साईमंदिराला दर्शन घेणाऱ्या भाविक भक्तांची संख्या दर दिवशी ३०० ते ४०० तसेच दर गुरूवारला हजाराच्या वर असते. परंतु मंदिरापर्यंत जाण्याकरीता पक्का रस्ता व पथदिवे नसल्यामुळे येणाऱ्या भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.सद्यस्थितीत दर्शनाला येण्याकरिता पवनी मच्छीमार सोसायटीच्या मार्गाने कुऱ्हाडा तलावाच्या पाळीवरून एक जुना कच्चा रस्ता उपलब्ध आहे तसेच गोसे धरणाच्या उजव्या कालव्याच्या दिशेकडून मंदिराकडे येणारा अतिशय कच्चा व असुरक्षित आडमार्गाचा वापर करावा लागत आहे. पवनी परिसरातील स्थानिक नागरिकांच्या व साईभक्तांच्या सुरक्षित व सोयीच्या रहदारीकरीता निलज नागपूर मेन रोडवरील पवनी बस आगार समोरून ते शेषनगर, संताजीनगर ले-आऊट मधून पुढे भगवाननगर व बेलघाटा वॉर्ड पवनीपर्यंत एक सुरक्षित व पक्का एप्रोच रोड असावे, अशी रास्त मागणी जनतेच्या वतीने सातत्याने होत आहे. तसेच असलेल्या काही किरकोळ तांत्रिक अडचणी सोडवून स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरसेवक, ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी संयुक्तपणे प्रयत्न करून मच्छीमार सोसायटी पवनीच्या बाजूंनी कुऱ्हाडा तलावाच्या पाळीवरून एक सुरक्षित, पक्का रहदारी मार्ग व पथदिव्यांची व्यवस्था संबंधित विभागाच्या मार्फत करण्यात यावे मागणीची पूर्तता झाल्यास संपूर्ण पवनी व परिसरातील नगरवासी जनता आपले आभार मानतील, याने या दुर्लक्षित असलेल्या परिसराचा आणखी विकास होण्यास मदतच होईल. (तालुका प्रतिनिधी)