बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव कुशल मेश्राम, पूर्व विदर्भ समन्वय समितीचे सदस्य राजू झोडे, तसेच वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते राजू लोखंडे प्रामुख्याने उपस्थित होते. २३ जुलै रोजी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी, महिला आघाडी राज्य महासचिव अरुंधती शिरसाठ यांचा भंडारा जिल्हा दौरा नियोजित आहे. हा जिल्हा दौरा त्यांच्या विदर्भ ‘संगठन समीक्षा दौरा’ यातील एक भाग आहे. बैठकीमध्ये होणाऱ्या जिल्हा दौऱ्याविषयी व त्यात होणाऱ्या संगठन समीक्षा बैठकीसंबंधी चर्चा करण्यात आली. विविध विषयांवर व होणाऱ्या संगठन समीक्षा बैठकीसंबंधात उपस्थित प्रमुख अतिथी यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीला वंचित बहुजन आघाडी भंडाराचे जिल्हाध्यक्ष सुरेश खंगार, जिल्हा महासचिव दिगांबर रामटेके, महासचिव अमित वैद्य, परमानंद देशपांडे, ॲड. नंदगवळी, जिल्हा उपाध्यक्ष अरविंद गोस्वामी, देवानंद वालदेकर, नरेंद्र बनसोड, भंडारा तालुकाध्यक्ष कार्तिक तिरपुडे, महासचिव मुस्तक पठाण, महावीर घोडेस्वार, लाखनी तालुकाध्यक्ष दीपक जनबंधू, पवनी तालुकाध्यक्ष संघदीप देशपांडे, भंडारा शहराध्यक्ष सोमेंद्र शहारे, नेहाल कांबळे, विजय रंगारी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.