शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षा अ‍ॅप निर्मितीत भूषण सपाटे यांचा वाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 22:40 IST

शिक्षकांना वर्गात मोबाईल वापरावर सूट दिली गेली. त्यानंतर अनेक शिक्षकांनी शिक्षणविषयक अ‍ॅप तयार केले. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत ‘दीक्षा’ अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली. या निर्मितीत भंडारा येथील जीजामाता विद्यालयातील सहाय्यक शिक्षक भूषण फसाटे तसेच प्राथमिक शिक्षक देवानंद घरत, कैलाश चव्हाण, शिवशंकर राठोड यांनी योगदान दिले. त्यांच्या या योगदानाबद्दल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते पुणे येथे सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हयाला मानाचा तुरा : प्राथमिकचे तीन शिक्षक सहभागी, मंत्र्यांच्या हस्ते सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : शिक्षकांना वर्गात मोबाईल वापरावर सूट दिली गेली. त्यानंतर अनेक शिक्षकांनी शिक्षणविषयक अ‍ॅप तयार केले. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत ‘दीक्षा’ अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली. या निर्मितीत भंडारा येथील जीजामाता विद्यालयातील सहाय्यक शिक्षक भूषण फसाटे तसेच प्राथमिक शिक्षक देवानंद घरत, कैलाश चव्हाण, शिवशंकर राठोड यांनी योगदान दिले. त्यांच्या या योगदानाबद्दल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते पुणे येथे सन्मानित करण्यात आले.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत शिक्षण विभागाकडून राष्ट्रीय शिक्षण प्रशिक्षण परिषदेच्या दीक्षा अ‍ॅपवर महाराष्ट्र इन सर्विस टिचर्स रिर्सोस अ‍ॅप मित्र २० हे मोबाईल अ‍ॅप निर्माण करण्यात आले.यात २ जुलै रोजी दिक्षा अ‍ॅपचा शुभारंभ पुणे येथे करण्यात आला. ज्या शिक्षकांचा दिक्षा अ‍ॅपच्या निर्मितीत सहभाग होता. त्या सगळयांचा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. यात भंडारा जिल्हयातील माध्यमिक शिक्षक भूषण फसाटे, देवानंद घरत, कैलास चव्हाण, शिवशंकर राठोड यांचा समावेश होता.राज्यातील पहली ते दहावीच्या पाठ्या पुस्तकांमध्ये प्रत्येक पाठासाठी क्यूआर कोड दिला गेला आहे. क्यूआर कोडच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले ई-साहित्य दीक्षा अ‍ॅपशी जोडले गेले आहेत. शिक्षकांना हा ई-साहित्य सहज वापरण्यासाठी दीक्षा अ‍ॅपचा फायदा होणार आहे. राज्यातील शिक्षकांनी व विषय सहायकांनी ई-साहित्य तयार करुन दीक्षा अ‍ॅपरला समृध्द बनविण्यास मदत केली. त्यात भंडारा जिल्हयातील या चार शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे. जिल्हयाने दिलेल्या योगदानामुळे जिल्हयाची शिक्षण क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला आहे. डिजीटल माध्यमे प्रभावी होत असून शिक्षणात या माध्यमाचा बराच उपयोग होत आहे. व्हिज्युअल माध्यमामध्ये मोठी शक्ती आहे. जे ऐकले जाते ते लवकर लक्षात राहते. शाळांमध्ये मोबाईलच्या माध्यमातून शिक्षणाला पुरक व्हीडीओ व अन्य शैक्षणिक बाकी दाखविणे शक्य झाले आहे. जिल्ह़ातील शिक्षकांनी राज्यस्तरावर तयार केलेल्या अ‍ॅपच्या निर्मितीत मोठा सहभाग दिल्याने त्यांचे शिक्षण क्षेत्रात कौतुक होत आहे.