शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पटेल महाविद्यालयात दिग्विजय दिवस उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:59 IST

येथील स्थानिक जे.एम. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मंगळवार ११ सप्टेंबर रोजी स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो येथील ऐतिहासिक भाषणाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव दीनानिमित्त दिग्विजय दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देउपक्रम : स्वामी विवेकानंदांच्या आठवणींना उजाळा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : येथील स्थानिक जे.एम. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मंगळवार ११ सप्टेंबर रोजी स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो येथील ऐतिहासिक भाषणाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव दीनानिमित्त दिग्विजय दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने नुकताच एक ठराव मंजूर करून विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांनी ११ सप्टेंबरला दिग्विजय दिवस साजरा करण्याचे निर्देश दिले होते.त्या अनुषंगाने पटेल महाविद्यालयात हा कार्यक्रम राबविण्यात आला. मंचावर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे, इंटरनल क्वॉलिटी अश्युरंस सेलचे समन्वयक डॉ. कार्तिक पानिकर आणि विशेष अतिथी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि सध्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सीनेट सदस्य प्रवीण उदापुरे हे होते.कार्यक्रमाची सुरूवात स्वामी विवेकानंदाच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून झाली.प्रवीण उदापुरे यांनी उपस्थित युवकांना स्वामी विवेकानंदाच्या जीवन चरित्राला उद्देशून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अमेरिकेतील शिकागो या शहरी १२५ वर्षाअगोदर याच दिवशी सर्व धर्म विश्व संसदेला स्वामी विवेकानंद यांनी संबोधन करून पूर्ण जगाचे लक्ष भारताच्या संस्कृतीकडे वेधून घेतले होते.त्यांच्या त्या ऐतिहासिक व्याख्यानाची आजच्या तरूण युवा पिढीला जाणीव व्हावी या उद्देशानेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने नुकताच एक ठराव मंजूर करून विद्यापीठ अंतर्गत येणाºया सर्व महाविद्यालयांनी ११ सप्टेंबरला दिग्विजय दिवस साजरा करण्याचे निर्देश दिले.अध्यक्ष प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही वेचक वृतांत कथन केले आणि त्यांच्या शिकागो येथील ऐतिहासिक भाषणाचे सर्वांनी सामूहिक वाचन केले व त्यांच्या सोबत उपस्थित युवकांनी त्यांना साथ दिली.यानंतर सभागृहामध्ये स्क्रीन वर स्वामी विवेकानंदांच्या भाषणाची विडिओ फित दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र शाह यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी, क्रीडा विभाग विद्यार्थी, प्राध्यापक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होे. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

टॅग्स :J.M. Patel Collegeजे. एम. पटेल महाविद्यालय