शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

हेलीपॅड उभारणीत अडचणींचा डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 21:49 IST

लोकसभा निवडणुकीत नेत्यांचे हवाई दौरे नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. दिल्ली-मुंबईचे स्टार प्रचारक हेलिकॉप्टरने येवून सभा गाजवतात. भंडारा जिल्ह्यातही आगामी निवडणुकीत नेत्यांच्या हवाई दौऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यात हेलिपॅडसाठी आदर्श जागेची शोधाशोध करावी लागत आहे. भात खचरे आणि शेतीचा आगार लहान असल्याने हेलिपॅड उभारणीत समस्यांचा डोंगर उभा आहे.

ठळक मुद्देजागेची शोधाशोध : भात खचरे आणि शेतीचा लहान आकार ठरतेय अडसर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लोकसभा निवडणुकीत नेत्यांचे हवाई दौरे नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. दिल्ली-मुंबईचे स्टार प्रचारक हेलिकॉप्टरने येवून सभा गाजवतात. भंडारा जिल्ह्यातही आगामी निवडणुकीत नेत्यांच्या हवाई दौऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यात हेलिपॅडसाठी आदर्श जागेची शोधाशोध करावी लागत आहे. भात खचरे आणि शेतीचा आगार लहान असल्याने हेलिपॅड उभारणीत समस्यांचा डोंगर उभा आहे.निवडणुकीच्या काळात वेगाने प्रचार करता यावा यासाठी प्रत्येक पक्ष हेलिकॉप्टर दौऱ्यांचे नियोजन करतात. जिल्ह्यातही दिल्ली-मुंबईचे स्टार प्रचारक हेलिकॉप्टरने येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला प्रारंभ होताच अनेक पक्षांचे नेते हेलिकॉप्टरने जिल्ह्यात दाखल होतील. या दौऱ्यांसाठी हेलिपॅड आवश्यक असते. भंडारा जिल्ह्यात विमानतळ नसल्याने सभेच्या आसपास हेलिपॅड तयार केले जाते. त्यावर नेत्यांचे आगमण होते.हेलिपॅड आवश्यक जागा धोरण २५ जानेवारी २०१८ नुसार ५४२ मीटर बाय ५२ मीटर अशी हेलिपॅडसाठी जागा आवश्यक आहे. वृक्ष आणि वीज खांब असलेल्या परिसरात हेलिपॅड तयार करण्यासाठी प्रशासन परवानगी देत नाही. हेलिपॅड व हेलिकॉप्टरसाठी प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणूक काळात भंडारा जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी विजय भाकरे यांना परवानगीचे अधिकार देण्यात आले आहे. त्यांच्याकडे तीन दिवस आधी अर्ज करावा लागतो. त्यात संपूर्ण तपशील संबंधित पक्षाला द्यावा लागतो. त्यानंतर बांधकाम विभागातून जागेचा अहवाल आणि पोलीस अधीक्षकांकडून सुरक्षात्मक अहवाल आल्यावर परवानगी दिली जाते.मात्र भंडारा जिल्ह्यात हेलिपॅडसाठी आदर्श जागा अत्यंत कमी आहे. भाताचे खचरे आणि शेतीचा आकार लहान आहे. तर अनेक ठिकाणी शेतात वीज खांब आहेत. त्यामुळे परवानगी देताना प्रशासनापुढे मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. शासकीय जागांवर झुडपी जंगल आहे. वनविभागाच्या अखत्यारीत असलेल्या अशा जागांची पूर्व परवानगी घ्यावी लागते. भंडारा शहरालगत पुर्वी बेला येथे हेलिपॅड तयार केले जायचे परंतु आता तेथेही घरे झाले. त्यामुळे हेलिपॅडची परवानगी कशी द्यावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकंदरीतच जिल्ह्यात हेलिपॅडसाठी आदर्श जागा शोधताना अडचणींचा डोंगर पार करावा लागत आहे.अशी घ्यावी लागेल परवानगीनिवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतर राजकीय पक्षांना त्यांचे स्टार प्रचारक, महत्वाचे नेते यांना प्रचारासाठी आणताना हेलिकॉप्टर व हेलिपॅडसाठी परवानगी घ्यावी लागेल. हेलिकॉप्टरने किती प्रवासी प्रवास करणार आहे, उतरण्याची व उड्डाणाची वेळ, जागेचा सातबारा, लांबी-रूंदी दर्शक नकाशा, जमीन मालकाची संमत्ती आणि आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे.जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी केली जात आहे. हेलिपॅड व हेलिकॉप्टरच्या संदर्भात असलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल. हेलिपॅड व हेलिकॉप्टरवर होणारा खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चात दाखविणे अनिवार्य आहे.-विजय भाकरे, अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी, भंडारा.