शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

प्रलंबित मागण्यांसाठी विविध संघटनांचा आज लाक्षणिक संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 06:00 IST

या आंदोलनात जिल्ह्यातील सुमारे अडीच ते तीन हजार कर्मचारी सहभागी होणार असून जोपर्यंत शासन जुनी पेंशन योजना लागू करीत नाही तसेच कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्या पूर्ण करीत नाही, तोपर्यंत संप सुरु ठेवण्याचा इशारा समन्वय समितीने उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे यांना दिलेल्या निवेदनातून यापुर्वी दिले होते.

ठळक मुद्देशासकीय-निमशासकीय कर्मचारी : संपाला विविध संघटनांचा पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : २००५ नंतर शासकीय सेवेत रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेंशन योजना (डीसीपीएस) राज्य शासनाने लागू केली आहे. या योजनेच्या निषेधार्थ व अनेक प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील शासकीय शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्या सोमवारी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्याचा इशारा विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.या आंदोलनात जिल्ह्यातील सुमारे अडीच ते तीन हजार कर्मचारी सहभागी होणार असून जोपर्यंत शासन जुनी पेंशन योजना लागू करीत नाही तसेच कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्या पूर्ण करीत नाही, तोपर्यंत संप सुरु ठेवण्याचा इशारा समन्वय समितीने उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे यांना दिलेल्या निवेदनातून यापुर्वी दिले होते. परंतु मागणीची पूर्तता न झाल्याने ९ सप्टेंबर रोजी कर्मचाऱ्यांनी पुन्हा संपाचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व संवर्गातील वेतन त्रृटी दूर कराव्यात, खासगीकरण, कंत्राटीकरण बंद करून केंद्राप्रमाणे सर्व भत्ते कर्मचाऱ्यांना देण्यात यावे, लिपीकांसह सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करून महिलांना केंद्राप्रमाणे प्रसूती व बालसंगोपन रजा, शासकीय रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात यावी, चतुर्थ कर्मचाऱ्यांची होणारी पिळवणूक थांबविण्यात यावी, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नये तसेच सर्वच विभागात होणारी अधिकाऱ्यांकडून पिळवणूक थांबवावी, यासाठी संपूर्ण राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षकेत्तर समन्वय समितीतील जुनी पेंशन योजनेचे जिल्हाध्यक्ष संतोष मडावी, उपाध्यक्ष गोपाल मेश्राम, राज्य संपर्क प्रमुख सुधीर माकडे, सरचिटणीस एनकीकर, अखील भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे रमेश सिंगनजुडे, सरचिटणीस सुधीर वाघमारे, पदवीधर शिक्षक संघाचे युवराज वंजारी, प्राथमिक शिक्षक संस्थेचे संजीव बावनकर, दिलीप बावनकर, मुकुंद ठवकर, सुधाकर ब्राम्हणकर, नामदेव गभणे, तुलसी हटवार, विकास खापर्डे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष ईश्वर नाकाडे, सचिव हरिकीशन अंबादे, कार्याध्यक्ष रामभाऊ कोरे, कोषाध्यक्ष बलवंत भाकरे, प्रवक्ता श्रीधर काकीरवार, राज्य प्रतिनिधी मोहन पडोळे यांच्यासह जिल्ह्यातील राज्य शासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर समन्वय समिती, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच निमशासकीय कर्मचाऱ्यांनी पुढकार घेतला आहे. राज्य संघटनांच्या आवाहनानुसार ९ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात संप पुकारण्यात येणार असल्याने कामकाजावर विपरीत परिणाम होणार आहे. मागण्यांची पुर्तता करावी अन्यथा ११ सप्टेंबरला कामबंद आंदोलनाचा इशारा आहे.सर्व संघटना येणार एकाच छताखालीजुन्या पेंशन योजनेसाठी आतापर्यंत अनेक आंदोलन करण्यात आली आहेत. परंतु शासनाने मागणी पूर्ण न केल्याने कर्मचारी मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन संपूर्ण राज्यभर करणार आहे.-संतोष मडावी, जिल्हाध्यक्ष, जुनी पेंशन हक्क संघटना, भंडारा.

टॅग्स :Government Employees Strikeसरकारी कर्मचाऱ्यांचा संप