शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

ढोंगी ज्योतिषाचा अंनिसकडून भंडाफोड

By admin | Updated: April 21, 2016 00:32 IST

शहरातील एका उपहारगृहातील खोलीत चमत्कार करुन लोकांना आजारमुक्त करण्याचा दावा करणाऱ्या ज्योतिषाने आपले बस्तान मांडले होते.

शहरातील हॉटेलमध्ये सुरु होता गोरखधंदाभंडारा : शहरातील एका उपहारगृहातील खोलीत चमत्कार करुन लोकांना आजारमुक्त करण्याचा दावा करणाऱ्या ज्योतिषाने आपले बस्तान मांडले होते. परंतु त्याचा हा गोरखधंदा यशस्वी होण्यापुर्वीच महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने त्याचा भंडाफोड केला.कुंडलीक पंजाबराव झुंगे (५०) रां कारकी जिल्हा यवतमाळ असे तथाकथित महाराजाचे नाव आहे. चेहरा, हस्तरेखा व छायाचित्र पाहून भविष्य सांगण्याचा दावा करणारे पत्रक त्याने शहरात वितरीत केले होते. याशिवाय पुत्रप्राप्ती, व्यापार, प्रगती, शारीरिक व्याधी, गृह पीडा, राजनैतिक वाद, कठीण समस्यांवर समाधान काढून देण्याचीही पत्रकात उल्लेख होता. त्यावर भ्रमणध्वी क्रमांक व भेटण्याची वेळ, शुल्कासह नमूद केली होती. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे प्रधान जिल्हा सचिव मेहमुद अली यांनी जिल्हा कार्याध्यक्ष विष्णूदास लोणारे यांना याबाबत माहिती देऊन चर्चा करण्यात आली. शनिवारला, भंडारा पोलीसात तक्रार करण्यात आली. ठाणेदार जयवंत चव्हाण यांनी दखल घेत पोलीस उपनिरीक्षक संदीपान उबाळे, पोलीस कर्मचारी प्रशांत गुरव, विजय तायडे तसेच मेहमुद अली व विष्णूदास लोणारे यांना घटनास्थळी पाठविले. त्यावेळी हा ज्योतिषी आपला दरबार लावून बसला होता. प्रकृती बरी राहत नसल्याचे सांगितले असता, त्याने तंत्र-मंत्राचे उच्चारण करुन उपचार सुरु केला. दरम्यान, पुत्रप्राप्तीसाठी शनी शांत करण्याचा सल्ला दिला. यावर विष्णू लोणारे यांनी आपली ओळख देऊन अंनिसचे पदाधिकारी असल्याचे सांगितले. कारवाई करण्याबाबत विचारणा केली असता, झुंगे याने हा माझा पिढीजात व्यवसाय असल्याची कबुली देत यापुढे लोकांची फसवणूक न करण्याचे आश्वासन देत माफी मागितली. बारावित शिकणारा मुलगा सोबत असल्याने या ज्यातिष्याला यापुढे असे कृत्य न करण्याबाबतचे हमीपत्र लिहून घेतल्यानंतर कायदेशीर कारवाईची तंबी देऊन सोडण्यात आले. या कारवाईत अंनिसचे प्रशांत रामटेके, मकबुल वारसी, लीलाधर बंसोड यांनी सहभाग घेतला. (नगर प्रतिनिधी)