शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धोबी समाजबांधवांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 23:23 IST

महाराष्ट्र राज्य धोबी समाज क्रांती विकास मंचच्यावतिने जिल्हाधिकारी कार्यालय भंडारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देसमितींचे अहवाल धूळखात : धोबी समाजाला अनुसूचित जातीत समाविष्ट करा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र राज्य धोबी समाज क्रांती विकास मंचच्यावतिने जिल्हाधिकारी कार्यालय भंडारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. धोबी समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करा अशी मुख्य मागणी धोबी समाज संयुक्त संघर्ष कृति समितीचे प्रमुख मार्गदर्शक शेखर कनौजिया यांनी आपल्या संबोधनात केली.या प्रसंगी शेखर कनौजिया, भाकपचे जिल्हा सचिव हिवराज उके यांचे प्रमुख मार्गदर्शन झाले. तसेच विलास केजरकर, धनराज चिचोडकर यांनीही आपले मनोगत सादर केले. शेखर कनोजिया यांनी सांगितले की, १९३६ ते १९६० पर्यंत मध्यप्रदेश सरकारमध्ये असतांना भंडारा व बुलढाणा जिल्ह्याला अनुसूचित जाती मध्ये समाविष्ट करण्यात आले होते. मात्र १९६० साली महाराष्ट्राचा निर्मिती झाली तेव्हा या दोन्ही जिल्ह्याला वगळण्यात आले. सामाजिक आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत मागास असलेल्या धोबी समाजावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात लढा दिल्यानंतर प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन समिती बनविण्यात आली. त्यानंतर डॉ.भांडे अभ्यास समिती बनविली पण या दोन्ही समितीचे अहवाल धुळखात पडलेले आहे.धोबी समाजाला अनुसूचित जातीत समाविष्ट करा म्हणून १९६ आमदारांनी सरकारला ई-मेल केले. तरी अजून पर्यंत काहीच झाले नाही. आणि म्हणून या धरणे आंदोलनाद्वारे जिल्हाधिकाºयांमार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस व समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक वरुण शहारे यांनी स्विकारले.यात धोबी समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करा, धोबी समाजाला कपडे धुण्यासाठी पाणी व धोबी घाटसाठी जमीन, समाज मंदीर, आर्थिक मदत, धंदा चालविण्यासाठी टिन शेडचे दुकान आणि सरकारी व खाजगी नोकरीत प्राधान्य देण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश होता.शिष्टमंडळात कॉ. शेखर कनौजिया, कॉ. हिवराज उके, विलास केजरकर, सुरेश कनौजिया, रामु कनौजिया, धनराज चिचोडकर, कमल कनोजे, विलास हरकंडे, मनोज कनोजे, कुणाल कनोजे, सचिन कनोजे, नरेश कनोजे, वामनराव चांदेवार इत्यादींचा समावेश होता.