शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

महागाव महसूल मंडळात धानपिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 00:44 IST

तालुक्यात १३ व १४ आॅक्टोबर रोजी महागाव महसूल मंडळात अचानक झालेला चक्रीवादळ व पावसाच्या तडाख्यामुळे हजारो हेक्टर मधील धान पीकाला फटका बसला आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : चक्रीवादळ व पावसाचा तडाखा

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : तालुक्यात १३ व १४ आॅक्टोबर रोजी महागाव महसूल मंडळात अचानक झालेला चक्रीवादळ व पावसाच्या तडाख्यामुळे हजारो हेक्टर मधील धान पीकाला फटका बसला आहे. वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अद्यापही सर्वेक्षण करण्यात आले नाही. खासदार नाना पटोले यांनी बाधित क्षेत्राच्या जानवा गावाला मंगळवारी भेट देऊन शेतकºयांना संयम राखण्याचे आवाहन केले.आसमानी व सुलतानी संकटामुळे बळीराजा सदैव त्रस्त असतो. दुष्काळाच्या दुष्टचक्राचे वलय सदैव त्याचा पाठलाग करीत असते. अवसायनात जीवन कंठीत असताना कर्जबाजारीपणा दूर होत नाही. तोच पुन्हा एकदा महागाव महसूल मंडळातील शेतकºयांवर एकाएकीच आभाळ कोसळले. १३ व १४ तारखेला आलेल्या वादळी पावसाने बळीराजाच्या तोंडात आलेला घास निसर्गाने हिरावला. शेतात झोपलेले धानपिक बघून त्यांचे डोळे पाणावले. शेतकºयांनी याची माहिती देताच खासदार पटोले यांनी मंगळवारी जानवा गावाला रात्री भेट देवून शेतातील धान पिकाची पाहणी केली. लगेच त्यांनी जिल्हाधिकाºयांशी शेतकºयांच्या व्यथा संदर्भात चर्चा केली. या नैसर्गिक संकटामुळे ७० टक्के धानपिकाचे नुकसान झाले आहे. या धानपीकाला तुडतुडा या किटकाचा प्रादुर्भाव आहे. पण निद्रावस्थेत असलेल्या धानपिकावर किटकनाशक फवारणी करणे सुद्धा शेतकºयांना शक्य नाही. हताश होऊन शेवटी तशाच अवस्थेत त्यांनी हे धानपिक सोडून दिले. यापूर्वी याच परिसरात २८ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसानेही धानपिकाची नासाडी केली होती. परिपक्वतेच्या वाटेवर असलेले हे धानपिक कापणी सुद्धा करु शकत नाही, अशी विदारक अवस्था परिसरातील शेतकºयांची आहे.यावेळी पटोले यांनी शेतकºयांना धीर दिला. ते म्हणाले पीक विम्याची योजना चुकीची आहे. पीक विमा काढलेल्या शेतकºयांना नुकसानभरपाई मिळायला हवी. हवामानाच्या आधारावर विमा मिळायला पाहिजे अशी मागणी आपण केंद्र शासनाकडे केली आहे. कर्जमाफीचे शासनाचे धोरण चुकीचे आहे. कर्ज भरणा केला त्यांना व ज्यांनी केला नाही अशानांही कर्जमाफीचा लाभ मिळायला हवा. आॅनलाईन पद्धत व सर्व्हर डाऊनमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.अनेकांचे अर्ज करुन देखील ते अपलोड झाले नाहीत. त्यामुळे सर्व शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यायला हवी. ओरिसा राज्यात धानाला २९९० रुपये प्रतिक्विंटल भाव तर महाराष्टÑात १५५० रुपये एवढा आहे. ही विषयमता का? असा प्रश्न निर्माण करुन शेतकºयांना प्रतिक्विंटल एक हजार रुपये बोनस देण्याची मागणी त्यांनी केली. शेतकºयांना धैर्य देताना एकोप्याने संकटाला सामोरे जा. प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन केले.