शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
3
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
6
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
7
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
8
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
11
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
12
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
13
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
14
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
15
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
16
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
17
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
18
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
19
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
20
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त

आरक्षणासाठी धनगर समाजाचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 22:13 IST

महाराष्ट्र शासनाने धनगर समाजाला दिलेल्या आश्वासनाचे चार वर्ष लोटूनही धनगर बांधवांना अनुसूचित जमाती आरक्षणाची अद्यापही अंमलबजावणी केली नाही तर शासनाला टी.स. चा अहवाल प्राप्त झाला असताना सुद्धा तोलवरूनच केंद्र सरकारला पाठवणार असे खोटे आश्वासन दिल्याने धनगर समाज संघर्ष समिती भंडारा जिल्ह्याच्या वतीने आज पासून बेमुदत आमरण उपोषणाचे आयोजन केले आहे.

ठळक मुद्देसंघर्ष सुरूच : मागण्या पूर्ण न झाल्यास जलसमाधी आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र शासनाने धनगर समाजाला दिलेल्या आश्वासनाचे चार वर्ष लोटूनही धनगर बांधवांना अनुसूचित जमाती आरक्षणाची अद्यापही अंमलबजावणी केली नाही तर शासनाला टी.स. चा अहवाल प्राप्त झाला असताना सुद्धा तोलवरूनच केंद्र सरकारला पाठवणार असे खोटे आश्वासन दिल्याने धनगर समाज संघर्ष समिती भंडारा जिल्ह्याच्या वतीने आज पासून बेमुदत आमरण उपोषणाचे आयोजन केले आहे.धनगर समाज संघर्ष समिती भंडारा जिल्हाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राजमाता अहिल्यादेवी होळकर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला माल्यार्पण करून उपोषण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आले. या उपोषणात उपोषणकर्ते जिल्हाध्यक्ष राजकुमार मरठे, उपाध्यक्ष जयशंकर घटारे, राजेश पेरे, दिनेश अहिर, सोनु हातेल, सुनिल मुकूर्णे, उमेश हातेल आदीचा समावेश आहे.२०१४ च्या निवडणुकापूर्वी विविध सभामध्ये व विशेषत: बारामती येथील सभेमध्ये आम्ही सत्तेत येताच धनगर समाजाला तात्काळ आरक्षण लागू करा असे वचन दिले होते. इतकेच नव्हे तर धनगर समाज संघर्ष समितीला लेखी पत्रही दिले होते. मात्र आपणास सत्तेत येवून चार वर्षाचा कालखंड लोटूनही आजपावतो धरगर आरक्षणाचा विषय आपण ताटकळत ठेवला आहे. आणि टिस च्या अहवालाचा आपण जो उल्लेख केला होता तो शासनाला प्राप्त झाला असून शासन केंद्र सरकारला अहवाल पाठवण्यास वेळकाढू धोरणचा अवलंब करित आहे.संविधानात अनुसूचित जमातीच्या यादीत अनुक्रमांक ३६ वर धनगर असा उल्लेख आहे. धनगर धनगड ही एकच जमात असून केवळ इंग्रजी लिपीतील ड व देवनागरीत र असा भाषेमुळे झालेला फरक आहे. ओरीसा, बिहार, झारखंड उत्तर प्रदेश सरकारने धनगड - धनगर हे एकच आहेत, असे मान्य करून त्या राज्यात त्यांना सवलती लागू केल्या आहेत. तर महाराष्ट्र राज्यातच का नाही. तसेच मेंढपाळांना चराई क्षेत्र खुले करण्यात यावे, मेंढपाळ वस्ती गावातील माळरान खुले करण्यात यावे आदी मागण्यांचे महाराष्ट्र शासनाने धनगर समाजाला दिलेल्या आश्वासनाचे चार वर्षे लोटूनही धनगर बांधवांना अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही तर शासनाला टी.स. चा अहवाल प्राप्त झाला असतानाही तो पाठविण्यात आला नाही. त्या अनुषंगाने धनगर समाज संघर्ष समिती जिल्हा भंडारा वतीने आमरण उपोषण सुरू केले आहे. सदर आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्यास संघटनेच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला आहे. यावेळी उपोषण मंडपात धनगर समाज संघर्ष समिती जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश हातेल, राजन पडारे, चंद्रशेखर अहिर, रवि घटारे, भगवान पडोळे, मोरेश्वर पडारे, मंगलदास खऊळ पंडितराव पांडे, सुरेश कवाने आदी उपस्थित होते.