शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

धम्म बोलण्यापेक्षा आचरणात आणावा

By admin | Updated: October 7, 2014 23:30 IST

धम्मचक्रपवर्तनानेच परिवर्तनाची क्रांती जन्मास आली. अन्यायावर मात करण्याची उर्जा प्राप्त झाली. माणसाच्या प्रत्यक्ष जगण्याला अर्थ प्राप्त झाला. स्वत: बुद्ध अनुयायी होणे म्हणजे समता, सहिष्णुता,

भंडारा : धम्मचक्रपवर्तनानेच परिवर्तनाची क्रांती जन्मास आली. अन्यायावर मात करण्याची उर्जा प्राप्त झाली. माणसाच्या प्रत्यक्ष जगण्याला अर्थ प्राप्त झाला. स्वत: बुद्ध अनुयायी होणे म्हणजे समता, सहिष्णुता, विवेकानिष्ठ वैज्ञानिक जाणीव आणि अनिश्वरवाद व अनात्मवाद याचा पुरस्कार करणे होय.तथागताच्या शिकवणीनेच माणसाचे मन प्रकाशित होते. उन्नत होते. प्रज्ञा, करूणा, मैत्री आणि शील या मानवी मूल्याच्या आविस्काराने मानवतेची स्थापना होते. धम्म हा बोलण्यात नसून आचारणात आहे. धम्माच्या नैतिक सदाचारातूनच सामाजिक जीवन निकोप व मैत्रीपूर्ण होईल, असे प्रतिपादन हर्षल मेश्राम यांनी केले. अशोक विजयादशमी निमित्त ५८ व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मधुकर रंगारी यांनी विचार व्यक्त करताना माणसाच्या बोलण्यात आणि वागण्यात दुटप्पीपणा नसावा. सकाळी बौद्ध आणि संध्याकाळी देविमायचा भक्त ही स्थिती दुभंगलेली मनोरूग्णता दर्शविते, म्हणून एकीने आणि नेकीने बुद्धाच्या शिकवणीचे आचरण करावे, असे विचार व्यक्त केले. याप्रसंगी उपस्थित असलेले अमृत शहारे, निवृत्त कार्यकारी अभियंता, कुंदा भोवते, इंजि. प्रभाकर भोयर, वसंतराव हुमणे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाची सुरूवात सामूहिक बुद्ध वंदनेने झाली. कार्यक्रमाच्या शेवटी पंचशील महिला मंडळ पटेलपुरा वॉर्ड भंडारा यांच्यातर्फे अल्पोपहार देण्यात आला. आभार महेंद्र वाहाणे यांनी मानले. कार्यक्रमाकरीता प्रा. रमेश जांगळे, ताराचंद नंदागवळी, शामल भादुडी, वामन मेश्राम, अ‍ॅड. डी.के. वानखेडे, यशवंत नंदेश्वर, असित बागडे, निर्मला गोस्वामी, मदन बागडे, महेंद्र वाहाणे यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)