शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

महासमाधी भूमी महास्तुपात उसळणार जनसागर आज धम्म महोत्सव : धम्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 22:42 IST

तालुक्यातील वैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या रुयाड (सिंदपुरी) येथील पञ्ञा मेत्ता संघद्वारा निर्मित भारत-जपान या मैत्रीचे प्रतीक ठरलेल्या महासमाधीभूमी महास्तुप येथे ३१ व्या धम्म महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमहोत्सवाला देश- विदेशातील बौद्ध भिक्कूची उपस्थिती आॅनलाईन लोकमत

पवनी : तालुक्यातील वैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या रुयाड (सिंदपुरी) येथील पञ्ञा मेत्ता संघद्वारा निर्मित भारत-जपान या मैत्रीचे प्रतीक ठरलेल्या महासमाधीभूमी महास्तुप येथे ३१ व्या धम्म महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोबतच महास्तुपाचा ११ वा, पञ्ञा मेत्ता बालसदनाचा दुसरा व पञ्ञा मेत्ता वाचनालयाच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त दि. ८ फेब्रुवारीला धम्म महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या धम्ममहोत्सवात जपान, म्यानमार, तिबेट, भारत आदी देश-विदेशातील बौद्ध भिक्कुंची मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार असल्याची माहिती महासमाधीभूमी महास्तुप रुयाळ येथे पत्रकार परिषदेत माजी न्यायाधीश अ‍ॅड. महेंद्र गोस्वामी यांनी दिली.यावेळी महेंद्र गोस्वामी यांनी सांगितले की, मानवतावादी दृष्टीकोणातून १९८२ पासून पञ्ञा मेत्ता संघ महाराष्ट्र, छत्तीसगढ, गुजरात, जम्मू काश्मिर, तामिळनाडू येथे सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्य करीत आहे. याचाच एक भाग म्हणून पवनी तालुक्यातील रुयाड (सिंदपुरी) येथील महासमाधी भूमीवर २००७ ला या महास्तुपाचे लोकार्पण करण्यात आले. या स्तुपात १५० फुट उंच भगवान बुद्धांची ध्यानस्त प्रतिमा व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बोधीसत्व देंग्यो दाईशी यांच्या ६-६ फुटाच्या प्रतिमा स्थापन करण्यात आल्या आहेत.देश- विदेशातून येणाºया बौद्ध भिक्कूंच्या उपस्थितीत होणाºया धम्म महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी भदंत संघरत्न मानके तर, उद्घाटक पञ्ञा मेत्ता संघ कमेटी जपानचे अध्यक्ष भदंत खोशो तानी व प्रमुख उपस्थितीत अखिल भारतीय भिक्कू संघाचे संघानुशासक भदंत सदानंद महास्थवीर, तेंदाई संघ इचिगुवो तेरासू उंदो जपानचे अध्यक्ष भदंत शोताई योकोयामा, म्यानमारचे भदंत डॉ. सयाडो उत्तमा, तिबेटचे भदंत लोबझान तेंबा, पय्या मेत्ता संघ जपानचे कार्याध्यक्ष भदंत शोंझे आराही जापानचे भदंत खोदो कोंदो, योशितेरू सामेजिमा, होंजिरी विहार सारनाथच्या भिक्खूनी म्योजिच्छू नागाकुबो, पश्चिम बंगालचे भदंत शुभरत्न, बौधिचेतिय संस्थान बुद्धभूमीचे अध्यक्ष भदंत धम्मदीप, विदर्भ भिक्कू संघाचे अध्यक्ष भदंत प्रियदर्शी, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय प्रचारक भदंत नागदिपांकर, प्रज्ञागिरी डोंगरगडचे भदंत धम्मतप, भदंत धम्मशिखर, नागपूरचे भदंत महापंत, भदंत मेत्तानंद, भदंत शिलवंत, भदंत संघकिर्ती, अरूणाचल प्रदेशचे भदंत वन्नास्वामी आदी उपस्थित राहणार आहेत.धम्म महोत्सवात यावर्षी बौद्ध प्रशिक्षण संस्था बुद्धभूमी महाविहार खैरीचे अध्यक्ष भदंत सत्यशील यांना पञ्ञा पिठक व बंजारा समाजात कार्य करणारे उमेश राठोड व उपासक बेलेकर यांना पञ्ञा पिठक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती दिली.