शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

भाविकांनी फुलणार उत्तरवाहिनी

By admin | Updated: January 14, 2015 23:03 IST

पुरातन काळापासून लाखांदूर तालुक्यातील दांडेगाव, मांढळ येथील चुलबंद नदीतिरावर भरणाऱ्या यात्रेनिमित्त हजारो भाविक गंगास्रानाचा लाभ घेणार आहेत. यात्रेनिमित्त येथे भागवत सप्ताहात

मांढळ येथे आज यात्रा : गंगा स्रानाला विशेष महत्वविरली (बु.) : पुरातन काळापासून लाखांदूर तालुक्यातील दांडेगाव, मांढळ येथील चुलबंद नदीतिरावर भरणाऱ्या यात्रेनिमित्त हजारो भाविक गंगास्रानाचा लाभ घेणार आहेत. यात्रेनिमित्त येथे भागवत सप्ताहात गोपालकाला आणि विविध मनोरंजक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.पूर्व विदर्भाची काशी आणि हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे उत्तरवाहिनी तिर्थक्षेत्र मकरसंक्रांतीला भाविकांच्या अलोट गर्दीने फुलून दिसणार आहे. यावेळी हजारो भाविक पवित्र गंगास्थानाचा लाभ घेवून आपल्या मित्रपरिवारासह फराळाचा आस्वाद घेतात.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मंगलभूमीत मागील ५० वर्षांपासून गुरूदेव सेवा मंडळाचे शेकडो अनुयायी ग्रामगीतेवर प्रवचन करून माझे गावच नाही का तिर्थ याची महती श्रोत्यांना पटवून देत आहेत.या तिर्थस्थळी चुलबंद नदी उत्तरेकडून वळसा घालून पुन्हा दक्षिणेकडे वाहत असल्याने या तिर्थस्थळाला उत्तरवाहिनी असे नाव पडले आहे. नावाप्रमाणेच येथे वाहिणीचा संथ वेग आणि आजू बाजूच्या वनराईचा सुगंधी गंध आहे. या ठिकाणी भगवान शंकराचे प्राचीन देवालय आहे.येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाचे मन नैसर्गिक तंद्रीत रमून जाते. त्यामुळेच या निर्जन स्थळी हजारो वर्षांपूर्वी ऋषीमुनींनी योगसाधना केल्याची साक्ष येथील मोठमोठे कुंड देतात. शेकडो वर्षांपासून या ठिकाणी मकरसंक्रांतीला भव्य यात्रा भरत असते. भाविक गुळपोहे, मुरमुऱ्याचे लाडू, तिळगुळ व चिवड्याचे फराळ करून नदीपात्रातील मऊ रेताळ गालिच्यांचा मनसोक्त आस्वाद घेतात. दुरवरून येणारे भाविक येथे मोठ्या श्रद्धेने मुंडण करवून घेतात. या ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी सभा मंडप बांधण्यात आले आहे.दांडेगाव आणि मांढळ या दोन्ही गावांच्या सहकार्यातून येथे दरवर्षी भागवत सप्ताहाचे आयोजन केले जाते. मकरसंक्रांतीच्या शुभपर्वावर एक दिवसीय यात्रेचे आयोजन केले जाते. येथील भागवत सप्ताहाचे हे ५१ वे वर्ष असून ९ जानेवारीपासून हभप रतनलालजी महाराज गुजरातवाले हे भागवतावर प्रवचने देवून भाविकांना मंत्रमुग्ध करीत आहेत. गेले सात दिवस दररोज सामुदायिक प्रार्थना आणि भजन, किर्तन आदी कार्यक्रमांमुळे येथे भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. मकरसंक्रांतील गोपालकाल्याने या भागवत सप्ताहाचा समारोप होईल. यात्रेनिमित्त येथे भाविकांची गर्दी उसळते. पोलीस विभागामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात येतो. या यात्रेत सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमामून कार्यक्रम सुरळीत पार पाडल्या जातात. (वार्ताहर)