शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पाच्या निरोपासाठी भाविक सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 22:30 IST

दहा दिवस भक्तांच्या हृदयात विराजमान असलेल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. रविवारी जिल्हाभरात बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. त्यासाठी भाविकांसोबत प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे. भंडारा शहरातील वैनगंगा नदीसह ठिकठिकाणच्या तलावात आणि पर्यावरण रक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम टाक्यांमध्येही गणेशाचे विसर्जन होणार आहे.

ठळक मुद्देआज जिल्हाभर विसर्जन : पोलीस विभागाच्यावतीने चोख बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दहा दिवस भक्तांच्या हृदयात विराजमान असलेल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. रविवारी जिल्हाभरात बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. त्यासाठी भाविकांसोबत प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे. भंडारा शहरातील वैनगंगा नदीसह ठिकठिकाणच्या तलावात आणि पर्यावरण रक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम टाक्यांमध्येही गणेशाचे विसर्जन होणार आहे.भंडारा जिल्ह्यातील घराघरात आणि गावागावात गणेशाची स्थापना गणेश चतुर्थीला म्हणजेच १३ सप्टेंबर रोजी उत्साहात करण्यात आली होती. जिल्ह्यात ७५५ खाजगी, १९२ सार्वजनिक तर १९८ गावात एक गाव एक गणपती स्थापन करण्यात आला होता. यासोबतच अनेकांच्या घरीही गणपती बाप्पा विराजमान झाले होते. दहा दिवस शहरासह जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण होते. भंडारा शहरातील भंडाराचा राजा, गणेशपुरचा राजा, बजरंग चौकातील त्रिमुखी दत्त रूपातील गणेशाचे दर्शन घेण्यासाठी दररोज रात्री भाविकांची प्रचंड गर्दी उसळत होती. विविध धार्मिक कार्यक्रमासोबत मंडळांनी सामाजिक कार्यक्रमांचेही आयोजन केले होते. आता रविवारी बाप्पांना निरोप देण्याची वेळ आली आहे. जड अंतकरणाने बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. मुर्तीचे विसर्जन शांततेत पार पाडावे यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने विजर्सन स्थळावर तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातही पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त आहे.भंडारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि ठाण्याच्याच ग्रामीण भागात नऊ असे ४६ सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली होती. १९ पासून गणेश विसर्जनाला प्रारंभ झाला. मात्र रविवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरातील १४ आणि लगतच्या ग्रामीण भागातील तीन गणेशाचे विसर्जन केले जाणार आहे. यासोबतच जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या विसर्जन होणार आहे. सागर तलाव, पिंगलाई बोडी, मिस्किन टँक, वैनगंगा नदी, सुरनदी, गावतलाव आणि पर्यावरणपुरक विजर्सन टँकमध्ये गणेशाचे विसर्जन केले जाणार आहे.भंडारा शहरातील वैनगंगा नदी, मिस्किन टँक याठिकाणी गणपतीचे विसर्जन होणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळ विसर्जन मिरवणूक काढून बाप्पाना वाजत गाजत निरोप देणार आहेत. तसेच घरगुती गणपतीचेही विसर्जन रविवारी केले जाणार आहे. यासाठी वैनगंगा नदीच्या तिरावर पोलिसांनी सुरक्षेची उपाय केले आहे. त्याची पाहणी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड, ठाणेदार सुधाकर चव्हाण यांनी केली.ईलेक्ट्रॉनिक बोट आणि प्रकाश व्यवस्थागणेश विसर्जनाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तासोबतच ईलेक्ट्रॉनिक बोट, प्रकाश व्यवस्था, पट्टीचे पोहणारे कर्मचारी, दोरखंड, हवा भरलेले रबरी ट्युब अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. रात्रीच्यावेळी कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलीस विभाग दक्ष राहणार आहे. जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक रश्मि नांदेडकर यांच्या नेतृत्वात तीन उपविभागीय पोलीस अधिकारी, दहा पोलीस निरीक्षक, २१ सहायक फौजदार, ४० पोलीस उपनिरीक्षक आणि एक हजार ७२ पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गणेश मिरवणुकीत पोलीस तैणात राहणार असून विसर्जनस्थळीही खडा पहारा राहणार आहे. सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि गणेश मंडळांचे स्वयंसेवकही या कामात मदत करणार आहे.पर्यावरणाचे रक्षण करागणेश विसर्जनस्थळी प्रत्येक मंडळाने पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मोठ्या प्रमाणात नदीपात्रात आणि विसर्जन स्थळी निर्माल्यासह विविध वस्तु टाकल्या जातात. त्यामुळे विसर्जन स्थळाला विद्रुप काही दिवसानंतर येते. यासाठी घरगुती गणेशाचे शक्यतोवर पर्यावरणपुरक कृत्रिम टँकमध्येच नागरिकांनी विसर्जन करण्याची गरज आहे.