शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इन्स्पायरमधून घडतोय सृजनशक्तीचा विकास

By admin | Updated: September 16, 2015 01:26 IST

जीवनात निर्माण होणाऱ्या विविध समस्यांचे समाधान करण्यासाठी विज्ञानाचा उपयोग करुन विद्यार्थी ....

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी : ऊर्जा निर्मितीवर आधारित मॉडेल जास्तइंद्रपाल कटकवार भंडाराजीवनात निर्माण होणाऱ्या विविध समस्यांचे समाधान करण्यासाठी विज्ञानाचा उपयोग करुन विद्यार्थी सक्षम व समृध्द झाला पाहिजे, हा मुळ उद्देश समोर ठेवून केंद्र तथा राज्य शासनाच्या माध्यमातून पुरस्कृत इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनीतून शेकडो विद्यार्थी आपल्यामधील सृजन शक्तीचा विकास घडवित आहेत. महर्षी विद्या मंदिर बेला येथे आयोजित इन्स्पायर अवॉर्ड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत सादर करण्यात आलेल्या प्रतिकृतींमधून विद्यार्थ्यांचे बुध्दी कौशल्य दिसून येत आहे. भारताचे दिवंगत राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून व ११ व्या पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून सदर इन्स्पायर अवॉर्ड उपक्रम अविरतपणे चालविला जात आहे. सन २०१४-१५ अंतर्गत केंद्र शासन, माहिती व तंत्रज्ञान विभाग नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक, संशोधन परिषद पुणे आणि राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने इन्स्पायर अवॉर्ड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन १४ ते १६ सप्टेंबरपर्यंत महर्षी शाळेत करण्यात आले आहे. या प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी सर्वात जास्त प्रतिकृती उर्जेवर आधारित साकारलेली आहेत. ऊर्जा कशी तयार करता येईल, उर्जेची बचत व शुध्द पाणी मिळण्यावर, या बाबींवर विद्यार्थ्यांनी भर दिला आहे. प्रदर्शनीत माती व पाणी व्यवस्थापन, धुरापासून वीज निर्मिती, गंगा स्वच्छता अभियान, सोलर वाटर हिटर, सोलर वाटर पंप सिस्टम, कागदी कचऱ्यापासून इंधन व विद्युत निर्मिती, स्वयंचलित मोबाईल मनोरा, पावसाच्या पाण्याचे सनियोजन, भुकंप अलार्म सिस्टम, ग्रामीण भागात पाण्यापासून वीज निर्मिती, पाणी शुध्दीकरण संयत्र, रस्ते व लोहमार्गावरील भुस्खलन एक समस्या आदी विषयांवर आधारित प्रतिकृती विद्यार्थ्यांनी सादर करण्यात आलेले आहेत. या प्रदर्शनीचे आज मंगळवारी दुपारच्या सुमारास उद्घाटन करण्यात आले.