शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गुरुमुळे होतो सृजनशील विचारांचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2017 00:14 IST

मानवी जीवनात एखाद्या व्यक्तीत ९९ टक्के अवगुण तर एक टक्का चांगला गुण असेल तर त्या एक टक्का गुणाला विकसित करण्याचे खरे कार्य गुरु करित असतो.

विनिता साहू : महर्षी शाळेत गुरुपौर्णिमा उत्सवलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मानवी जीवनात एखाद्या व्यक्तीत ९९ टक्के अवगुण तर एक टक्का चांगला गुण असेल तर त्या एक टक्का गुणाला विकसित करण्याचे खरे कार्य गुरु करित असतो. गुरुंच्या मार्गदर्शनामुळे आत्म्याचे शुध्दीकरण होऊन सृजनशील विचारांचा विकास होतो, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केले. महर्षी विद्या मंदिर शाळा उमरी (भंडारा) येथे गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर प्राचार्य श्रृती ओहळे उपस्थित होत्या. महर्षी वेदव्यास यांच्या जयंतीचे औचित्य गुरु पूजनाच्या दिवशी अत्यंत महत्वाचे आहे. कार्यक्रमाची सुरुवात अतिथींच्या हस्ते गुरुपूजनाने करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतीक सदरात अप्रतिम नृत्य सादर करुन उपस्थित शेकडो विद्यार्थ्यांसह पालकांची मने जिंकून घेतली. सकाळ सत्रात सहा सत्रीय महासत्यनारायणची पुजा करण्यात आली. यात ४३२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक साहू यांच्या हस्ते महर्षींच्या जीवनावर आधारित तथा शाळेसंबंधी माहितीच्या पुस्तकाचे विमोचण करण्यात आले. साहू म्हणाल्या की, प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये प्रतिभा लपलेली असते. ती प्रतिभा बाहेर काढण्याचे काम शिक्षक करीत असतात. विश्वशांती अभियानांतर्गत हिंदू संस्कृतीचा अभिमान सर्वांनी बाळगायला हवे असेही त्या म्हणाल्या. दरम्यान शनिवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातून विश्व शांती अभियानाचा शुभारंभ आ. अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांच्या हस्ते करण्यात आला होता. त्याचा समारोप आज रविवारी गुरुपौर्णिमेला झाला. उत्सवासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.