शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विकास करु या गावाचा, दिवा लावू या ज्ञानाचा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:00 IST

ग्रामीण भागातील कलावंत दंडार, तमाशा, नवटंकी नाटीका या लोककलेचा आजही सन्मान करतात. या कलावंत मंडळींनी लोककला जीवंत ठेवली आहे.

ठळक मुद्देदंडारीतून प्रबोधन : कान्हळगाव येथे वृद्ध कलाकारांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : कसं सडलं दारुने मन, हरपले भान,पर्वा नाही केली रे जीवाचीलाज खोवली प्रतिष्ठेची.या पंक्तीतून दारुचे दुष्परिणाम कसे होतात याचे सादरीकरण दंडार या लोककलेच्या माध्यमातून कान्हळगाव/सिर. येथील सुभान मंडळाने कान्हळगाव येथे झालेल्या मंडई कार्यक्रमातून केला.ग्रामीण भागातील कलावंत दंडार, तमाशा, नवटंकी नाटीका या लोककलेचा आजही सन्मान करतात. या कलावंत मंडळींनी लोककला जीवंत ठेवली आहे. तथापि, ही ग्रामीण भागातील कलावंत उपेक्षित जीवन जगत आहे. या कलाकरांना शासनाच्या वतीने मानधन दिले जात नाही. तरीही कान्हळगावसारखे इतरही कलावंत कलेची साधना करीत आहेत. कान्हळगाव येथे गुरुवारी पार पडलेल्या दंडारीतून सुभान मंडळाचे प्रमुख रामदयाल लिल्हारे, गुरु बागडे यांनी अंधश्रध्दा, दारुबंदी, स्वच्छता तसेच शिक्षण या विषयावर मनोरंजनातून प्रबोधनाचे कार्य केले. जर, जर या, भर भर या, विकास करु या गावाचा दिवा लावू या ज्ञानाचा. यातून गावाचा विकास करण्यासाठी शिक्षणही कसा आवश्यक असतो. याविषयी महत्व पटवून दिले. एक दशकापूर्वी रामदास बोरकर या कलावंताने दंडारीच्या मंडळाला जन्म दिला होता.त्यांच्या मृत्यूनंतर शाहीर रामदयाल लिल्हारे, गुरु बागडे या प्रमुखानी बाबूराव कस्तुरे, नरबद कस्तुरे, बिहारी कस्तुरे, सरबत कस्तुरे, बंडू मारवाडे, नत्थू बागडे, दत्तू लुटे, सुर्यभान डोंगरे, मुरलीधर गलबले, भास्कर गलबले, विजय कस्तुरे, मनोज नागपूरे यांच्यासह या दंडारीच्या संचाला पुढे नेले आहे. दंडार, भजन आदी कार्यक्रमात आर्वाजून सक्रीय सहभाग होणारे वृध्द कलावंत बाबूराव कस्तुरे यांचा नाटय लेखक तेजराम मोहारे यांच्या हस्ते दंडारीच्या कार्यक्रमात शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच देवराम चवळे, राजू बांते, प्रा.डॉ. सुनिल चवळे, गणेश ठवकर, नाटय कलावंत रामप्रसाद वहिले आदींची उपस्थिती होती.