शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनस्थळांचा विकास करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 22:20 IST

भंडारा जिल्हा झाडीपट्टीचे काश्मीर म्हणून ओळखले जाते. पश्चिम महाराष्ट्रातील, मुंबई, पुणे, महाबळेश्वर पर्यटन स्थळाप्रमाणे भंडारा जिल्ह्यातही भरपूर वनवैभव, वन्यजीव, जैवविविधता, नैसर्गीक खळखळणारे झरे इत्यादीने समृद्ध संपन्न अशी अनेक सुंदर व रमणीय पर्यटन स्थळे असून सुद्धा पाहिजे

ठळक मुद्देपर्यटन मंत्र्यांना निवेदन : पश्चिम महाराष्ट्राला झुकते माप

आॅनलाईन लोकमतभंडारा : भंडारा जिल्हा झाडीपट्टीचे काश्मीर म्हणून ओळखले जाते. पश्चिम महाराष्ट्रातील, मुंबई, पुणे, महाबळेश्वर पर्यटन स्थळाप्रमाणे भंडारा जिल्ह्यातही भरपूर वनवैभव, वन्यजीव, जैवविविधता, नैसर्गीक खळखळणारे झरे इत्यादीने समृद्ध संपन्न अशी अनेक सुंदर व रमणीय पर्यटन स्थळे असून सुद्धा पाहिजे तसा पयृअन विकास आतापावतो झालेला नाही.महाराष्ट्र पर्यटन विकासातर्फे येथील पर्यटन स्थळांचा इको टयुरिझम आराखड्यात समावेश करून तातडीने त्यांच्या विकास करण्यासंदर्भात ग्रीन हेरिटेज संस्थेचे संस्थापक मो. सईद शेख यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशन दरम्यान रविभवन येथे राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना निवेदन देवून त्याबाबत चर्चा केली.मागील काही वर्षापासून गायमुख, आंबागड, पवनी, रावणवाडी इत्यादी ठिकाणी अधून मधून थातूर मातुरपणे कामे सुरू आहे. गायमुख येथे नैनितालची आठवण करून देणारे पर्वताच्या मधोमध रमणीय पांगडी जलाशय पर्यंत रोप वे व इतर विकास कामे, चांदपूर, कोका, पवनी येथील बौद्धकालीन स्तुप, गडकिल्ले, मंदिर घाट, गोसेखुर्द बांध, रावणवाडी जलाशय, तुमसर येथील माडगीजवळ वैनगंगेच्या मध्यभागी स्थित मिनी कन्याकुमारी अशी श्री नृसिंह टेकडी, पर्वतीय सौंदर्याने नटलेले कोरंभी, झिरी, हत्तीडोई, गडकुंभली साकोली, तसेच भंडारा येथील प्राचीन गिरी गोसावी यांची मंदिरे व समाध्या, अशी अनेक पर्यटन स्थळे व तिर्थक्षेत्रे जिल्ह्यात असून विकासाच्या प्रतिक्षेत आहेत.रावणवाडी, पवनी गोसेखुर्द, कोका, चांदपूर येथे पर्यटकांची सतत वर्दळ असते. आंबागड किल्ला, गायमुख, चांदपूर, कोरंभी, झिरी आदी ठिकाणीही पर्यटक भेट देत असतात. भंडारा जिल्हा पर्यटनाच्या बाबतीत महाराष्ट्राचे स्पेन आहे. पण आवश्यक सोईसुविधा इत्यादींची येथे गरज आहे. गायमुख, चांदपूर, कोका आदी बाबत ईको टयुरीझमचा प्रस्ताव वनविभागाच्या वतीने पुर्व उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांनी शासनाला पाठविला होता. पण तो प्रस्ताव आतापर्यंत रखडलेला आहे.ग्रीन हेरिटेज पर्यटन संस्था मागील अनेक वर्षापासून पर्यटन विकासाबाबत प्रयत्न व पाठपुरावा करीत आहेत. तसेच लोकप्रतिनिधींही यात प्रयत्नशील असतात. वर्तमानपत्रातून या संदर्भात बातम्या प्रकाशित होत असतात. पण याकडे नेहमी दुर्लक्ष होत असून निधीची कमतरता नेहमीच सांगितले जाते. याबाबतीत पश्चिम महाराष्ट्राला झुकते माप दिले जाते. ही एक शोकांतीकाच.भंडारा जिल्ह्याला पर्यटनाचा बाबतीत शासनाद्वारे झुकते माप देण्यात येवून, भरपूर निधी मंजूर करून उपेक्षित, प्रलंबित असलेल्या पर्यन स्थळांच्या विकास करण्यात यावे, असे पत्रात नमुद करण्यात आले होते.