शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

देव्हाडीतील आरोग्य केंद्र वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 23:34 IST

२३ गावांची आरोग्याची काळजी घेणारे देव्हाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अव्यवस्था तथा अधिकारी व कर्मचारी उपस्थित नव्हते. आरोग्य केंद्रातील साहित्य अत्यव्यस्थ पडून होते.

ठळक मुद्देसाहित्य अत्यवस्थ : अव्यवस्था, डॉक्टरासह कर्मचारीही अनुपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : २३ गावांची आरोग्याची काळजी घेणारे देव्हाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अव्यवस्था तथा अधिकारी व कर्मचारी उपस्थित नव्हते. आरोग्य केंद्रातील साहित्य अत्यव्यस्थ पडून होते. भौतिक सुविधेत अनेक त्रुट्या आ. चरण वाघमारे यांनी दिलेल्या आकस्मिक भेटीत दिसून आल्या. रुग्णांना तपासणीकरिता येथे डॉक्टर उपस्थित नव्हते, अशी माहिती थेट रजिस्टरवर आ. वाघमारे यांनी नमूद केले. यावेळी सरपंच, उपसरपंच तथा ग्रामपचांयत सदस्य उपस्थित होते.देव्हाडी येथे जिल्हा परिषद प्रशासनाच्या नियंत्रणातील प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. सुमारे २३ गावांची आरोग्याची काळजी हे प्राथमिक आरोग्य केंद्र घेते. २५ ते २६ हजार लोकसंख्येकरिता देव्हाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र तयार करण्यात आले आहे. सुमारे एक ते दीड कोटी रुपये खर्च करुन इमारत येथे तयार करण्यात आली. पंरतु प्राथमिक आरोग्य केंद्र वाºयावर असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. बुधवारी आ. चरण वाघमारे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला आकस्मिक भेट दिली. भेटीदरम्यान त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात अव्यवस्था आढळून आली.आरोग्य सेविका यु.डी. जाधव या एकमेव कर्मचारी उपस्थित होत्या. इतर कर्मचारी अनुपस्थित होते. काही वेळाने महिला डॉक्टर आरोग्य केंद्रात पोहोचल्या. तत्पूर्वी आ.वाघमारे आल्याची माहिती मिळाल्यावर इतर दोन ते तीन कर्मचारी नंतर आले.आ. वाघमारे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली तेव्हा त्यांना आरोग्य केंद्रातील साहित्य अस्तव्यस्त पडलेले दिसले. रुग्ण तपासणीकरिता आले होते. त्यांना तपासायला कुणीच डॉक्टर हजर नव्हते. भौतिक सुविधा सोडून इतर रेकॉर्ड पाहता आले नाही. जे अधिकारी व कर्मचारी उपस्थित नव्हते त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, असे भेट रजिस्टरवर आ. वाघमारे यांनी नमूद केले. महिला डॉक्टर गोस्वामी आरोग्य केंद्रात घरुन आल्यावर आ. वाघमारे यांनी त्यांना विचारल्यावर मी लहान बाळाला भोजन देण्याकरिता गेल्याचे सांगितले. दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र सोडून जातांनी हलचल रजिस्टरवर नोंद केली काय? असा प्रतिप्रश्न आ. वाघमारे यांनी केला. शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे येथे दुर्लक्ष कारणीभूत आहे.आ. चरण वाघमारे यांनी दिलेल्या आकस्मीक भेटीप्रसंगी सरपंच रिना मसरके, पं.स. सदस्य अशोक बन्सोड, उपसरपंच लव बसीने, सुशिल बन्सोड, ग्रा. पं. सदस्य बालू सेलोकर, देवेंद्र शहारे, ज्ञानेश्वर बिरणवारे, उषा चावके, कुंदा बोरकर, ललीता नागपूरे, रत्ना मेश्राम, विमल बोंदरे, राजकुमारी लिल्हारे, माजी उपसरपंच जयंत पडोळे, पिंटू सिंग, बाळा मेश्राम सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.