शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

पाचशे किलो मोहफुलांचा सडवा नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 00:39 IST

कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मकरधोकडा, तिड्डी परिसरात नदी काठावर सुरू असलेल्या दारूच्या अवैध हातभट्टीवर पोलिसांनी धाड घालून कारवाई केली. या धाडीत सुमारे पाच लाख रूपयांचा पाचशे किलो मोहाफुल सडवा जप्त करण्यात आला.

ठळक मुद्देकारधा पोलिसांची कामगिरी : मकरधोकडा, तिड्डी नदीकाठावर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मकरधोकडा, तिड्डी परिसरात नदी काठावर सुरू असलेल्या दारूच्या अवैध हातभट्टीवर पोलिसांनी धाड घालून कारवाई केली. या धाडीत सुमारे पाच लाख रूपयांचा पाचशे किलो मोहाफुल सडवा जप्त करण्यात आला.या धाडीत पोलिसांनी मोहाफुल सडवाचे प्लॉस्टिक ड्रम, प्लॉस्टीकचे पोते, मातीच्या माठांमध्ये भरलेली दारू, रबरी ट्युबमध्ये भरलेली दारू आणि दारु गाळण्याकरिता पाच लाखांचा ५०० किलो मोहाफुल सडवा, १० हजारांचे २० लोखंडी ड्रम, ३००० हजारांचे १५ प्लॉस्टीक ड्रम, ३५०० रूपयांचे दारु गाळण्याचे जर्मनी कटोरे, जळावू लाकडे, १० रबरी ट्युबमध्ये भरलेली दारु असा ६ लाख ६६ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर हे सर्व साहित्य घटनास्थळी नष्ट करण्यात आले. याचे चित्रकरणही करण्यात आले. वैनगंगा नदीकाठावर मागील अनेक दिवसांपासून अवैधरित्या दारु गाळण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु होते. परंतु ही कारवाई पहिल्यांदाच झाल्याचे दिसून आले आहे. ही कारवाई कारधा ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक लांडे, सुनिल राठोड, प्रविण राठोड, अजय कुकडे, सुनिल हुकरे, प्रविण खाडे, वसंत भुरे यांनी केली.वैनगंगा नदीच्या पात्रापलिकडे दुर्गम स्थळी कुणी सहजासहजी येऊ शकत नाही किंवा कुणाच्याही नजरेस पडणार नाही. अशा ठिकाणी असलेल्या हा प्रकार सुरू होता. याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कंकाळे हे अधिनिस्त पोलीस कर्मचाºयांना घेऊन एका डोंग््याच्या साहाय्याने नदीपात्र परिसर पिंजून काढला असता नदी पात्रातील वेगवेगळ्या ठिकाणी अवैध मोहाफुल दारूच्या भट्ट्या असल्याचे पोलिसांना आढळून आले.सीमावर्ती भागात अवैध दारूविक्रीभंडारा जिल्ह्यातील पवनी व लाखांदूर तालुक्याला लागून दारुबंदी असलेल्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत. या परिसरात वैनगंगा नदीचा किनारा मोठ्या प्रमाणात असून या भागात गाळली जाणारी मोहफुल आणि देशी दारु या दारुबंदी जिल्ह्यात तस्करी करण्यात येत आहे.याशिवाय साकोली, लाखनी, लाखांदूर व पवनी या तालुक्यातील देशी दारुच्या भट्टीमधून दारुचा नियमित पुरवठा या दारुबंदी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मागील काही दिवसापूर्वी पवनी तालुक्यातील भावड येथील देशी दारुचे दुकान अधिक विक्रीमुळे बंद होते. त्यानंतर हे दुकान अनेक दिवस बंद राहिले. परंतु अधिकाºयांच्या संगनमताने या दारुभट्टीला पुन्हा परवानगी देण्यात आल्यामुळे हे दुकान पुर्ववत सुरु झाले. आता या दुकानातून मोठ्या प्रमाणात चंद्रपूर जिल्ह्यात दारुची तस्करी सुरु आहे. या तस्करीवर आळा घालण्यात भंडारा जिल्हा पोलिसांना अपयश आले असून कारवाई तीव्र करण्याची गरज आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी