मतमोजणी आज : विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार ?भंडारा : भंडारा जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या सात पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारला मतदान झाले. त्यानंतर कोण बाजी मारणार? हीच चर्चा प्रत्येकांच्या मुखात होती. जिल्हा परिषदेच्या ५२ गटासाठी ३१० तर पंचायत समितीच्या १०४ गणासाठी ५३३ अशा एकूण ८४३ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला आज सोमवारला होणार आहे. विजयाची माळ कुणाकुणाच्या गळ्यात पडते, ते दुपारी १२ वाजतापर्यंत कळेलच. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी आपले उमेदवार निवडणुकीत उभे केले होते. जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँगे्रस, भारतीय जनता पक्षाने ५२, शिवसेनेने ३८, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोन तर बहुजन समाज पॅनेल व बहुजन समाज परिषदेने उमेदवार उभे केले होते. प्रत्येकच राजकीय पक्षाने सत्ता स्थापन करण्यापर्यंत मजल मारल्याचा दावा करीत आहेत. असे असले तरी जिल्हा परिषदेत कुणाची सत्ता बसते, हे सोमवारला दुपारपर्यंत कळेलच. त्यानंतर कुणाच्या प्रभावक्षेत्रात कोण किती जागा जिंकून आणले, त्यावरुन ते विजयाचे शिल्पकार ठरतील. (जिल्हा प्रतिनिधी)५७२ कर्मचारी करणार मतमोजणीजिल्ह्यातील सातही मतमोजणी केंद्रात ५७२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात तुमसरात २० टेबलवर शंभर कर्मचारी, मोहाडी ११ टेबलवर ९० कर्मचारी, साकोलीत १२ टेबलवर ५० कर्मचारी, लाखनीत तुमसरात १२ टेबलवर ८० कर्मचारी, भंडाऱ्यात २० टेबलवर शंभर कर्मचारी, लाखांदुरात ११ टेबलवर ९२ कर्मचारी मतमोजणी करणार आहेत.
निकालाची उत्कंठा शिगेला
By admin | Updated: July 6, 2015 00:25 IST