बळीराजा संकटात : सावकारी पाशात अडकणार, तेलही गेले तुपही गेले अशी अवस्थाराहुल भुतांगे तुमसरशेतकऱ्यांनी हातात असलेल्या थोड्याफा पुंजीतून सहकारी सोसायटी व बँकेतून घेतलेल्या कर्जाचे पुनर्गठन केले अन् त्यानंतर नव्याने कर्ज देण्यास बँकेने नकार दिल्याने हातची पुंजी घालवून नवी पुंजी मिळेनाशी न झाल्याने तालुक्याती शेतकऱ्यांची अवस्था ‘तेलही गेले अन् तुपही गेले’ अशीच झाली आहे.तुमसर तालुक्यातील आष्टी जि.प. क्षेत्राअंतर्गत विविध विकास सोसायटीच्या सभासदांनी कर्जाचे पुनर्गठन व पीक कर्जाची मुदतीत परत फेड केली तरी देखिल सहकारी सोसायटी व जिल्हा बँकेकडून कोणत्याही प्रकारचे वाटप शेतकऱ्यांना केले जात नाही. शासनाचा निधी नसल्याने कर्ज देता येत नसल्याचे शेतकऱ्यांना सांगून या बँकेतून त्या बँकेत पाठविणे सुरू आहे. ऐन खरिपाच्या हंगामात पुनर्गठन करूनही कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यासमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. गत हंगामात असलेल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना शेतात कुठलेच पीक घेता आले नाही. त्यामुळे घेतलेले कर्ज थकित झाले. परंतू शासन या कर्जाचे ३० जून २०१६ ला बँकेने पुनर्गठन केले तर सोसायटीच्या सभासदानी पिक कर्ज भरले तर ज्यांच्या कर्जाचे पुनर्गठन झाले त्यांना आणि ज्यांनी नियमित कर्जाच्या भरणा केला त्यांना पुन्हा नव्याने कर्जपुरवठा होणे गरजेचे आहे. मात्र या संदर्भात शेतकरी सोयायट्या व जिल्हा बँकेचे हेलपाट्या खात आहेत. अधिकाऱ्यांकडून उडवा उडवीच्या उत्तराशिवाय शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही. याउलट बँकेत पैसे नाही, शासन जेव्हा देईल तेव्हाच बँकेत या असे सांगून शेतकऱ्यांची बोळवण केल्या जात आहे. पिक कर्ज मिळाले नाही. मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे व शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्यायच उरणार नाही.
कर्जासाठी सहकारी संस्थांचा नकार
By admin | Updated: July 28, 2016 00:34 IST