शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सासरा परिसरात डेंग्यूसदृश आजाराचा उद्रेक

By admin | Updated: August 28, 2014 23:34 IST

साकोली तालुक्यातील सासरा येथे पुन्हा एकदा डेंग्यूची साथ पसरली आहे. येथील दोन रुग्णांच्या चाचणीमध्ये डेंग्यूचे विषाणू आढळून आले. त्यांना नागपूर, साकोली येथे हलविण्यात आले आहे.

सासरा : साकोली तालुक्यातील सासरा येथे पुन्हा एकदा डेंग्यूची साथ पसरली आहे. येथील दोन रुग्णांच्या चाचणीमध्ये डेंग्यूचे विषाणू आढळून आले. त्यांना नागपूर, साकोली येथे हलविण्यात आले आहे.उन्हाळ्यात येथे डेंग्यूसदृष्य आजाराचे रुग्ण आढळून आले होते. रुग्णांमध्ये ६ ते १५ वयोगटातील बालके होते. डेंग्यूच्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे सरपंच योगराज गोटेफोडे व तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष रामचंद्र बोरकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला लेखी कळविले होते. त्यानंतर वैद्यकीय चमूने गावाला भेट दिली. नागरिकांना स्वच्छतेचा व आरोग्याचा संदेश देत जनजागृती केली. फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी केली. डेंग्यूसदृष्य आजार आटोक्यात आला. परंतु पावसाळ्याच्या दिवसात या आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. सध्या या आजाराचे दोन रुग्ण आढळले असून अधिक रुग्ण असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.डासांचा प्रादूर्भाव वाढला आहे. त्यात डेंग्यूला प्रसारीत करणारा एडीस डास असल्याचे नाकारता येत नाही. परिसरातील बहुतेक गावात डेंग्यूसदृष्य आजाराचे रुग्ण आढळून आले. परिसरातील कटंगधरा, न्याहारवाणी, विहिरगाव, सानगडी, सानगाव, शिवणीबांध आदी गावात रुग्ण आहेत. सानगडी येथे डेंग्यूसदृष्य आजाराचे रुग्ण आढळून आले. त्यापैकी काही रुग्ण नागपूर, भंडारा, साकोली, सानगडी येथे उपचार घेत आहेत. सासरा परिसरातील गावांमध्येही आरोग्य शिबिर लावण्याची मागणी आहे. या गावात धूरफवारणी आवश्यक आहे. या आजारावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणा अयशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी बहुतेक रुग्ण खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. परिसरात वाढते रुग्ण लक्षात घेता या आजाराने नागरिक भयभीत झाले आहेत.शहरातील रस्त्यांची दुर्गती व त्यावर पडलेल्या खड्यांंमध्ये पावसाचे पाणी साचून आहे. यात डासांची उत्पत्ती होत आहे. यावरही पालिकेकडून पाहिजे तशी फवारणी व कीटकनाशक पावडरचा मारा केला जात नसल्याचे दिसून आले आहे. परिणामी शहरात डासांचा प्रकोप वाढला असून शहरवासी त्रस्त झाले आहेत. हिवताप कार्यालयाकडून किडनाशक द्रव्य पुरविण्यात आले असतानाही फवारणी होत नसल्याचे चित्र येत आहे. (वार्ताहर)