लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अखिल भारतीय सरकारी कर्मचारी महासंघ, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा भंडारा, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ भंडारा यांच्या संयुक्त आवाहननुसार कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारला शासनाप्रती तीव्र असंतोष व्यक्त करीत लक्षवेध दिन व निदर्शने करण्यात आले.यामध्ये विशेषत: नवीन अंशदायी पेंशन योजना रद्द करून जुनी पेंशन योजना लागू करावी, सर्व रिक्त पदे नियमित सेवा तत्वावर भरणे, महिला कर्मचाºयांना दोन वर्षाची बाल संगोपन रजा, अनुकंपातत्वाची पदे विनाअट भरणे व इतर प्रलंबित मागण्यांचा समावेश या निदर्शनात करण्यात आला.या मागण्यांचा सकारात्मक विचार न झाल्यास राज्य व जिल्हा परिषद कर्मचारी दि. २० आॅगस्टला एक दिवसाचा राज्यव्यापी संप करतील, असा इशारा देण्यात आला. या लक्षवेधी दिनाचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.लक्षवेधी दिनी निदर्शने कार्यक्रमात सहसचिव जाधवराव साठवणे, कोषाध्यक्ष एस.बी.भोयर, विदर्भ विभाग सचिव विशाल तायडे, उपाध्यक्ष संजय पडोळे, सहसचिव डी एन.रोडके, गोविंदराव चरडे, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र जिल्हा शाखा सल्लागार रमेश व्यवहारे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ अध्यक्ष अतूल वर्मा, प्रमोद तिडके, प्रभुजी मते, जयेश वेदी, विवेक भरणे, कृतिशिल सेवानिवृत्त संघटना अध्यक्ष माधवराव फसाटे, अरुण चिखलीकर, जुनी पेंशनहक्क संघटना अध्यक्ष संतोष आर. मडावी, आर.एम.गडपायले, गौरीशंकर मस्के, केसरीलाल गायधने, चंदू तूरकर, मदारकर, इतर संघटनाचे पदाधिकारी, महिला भगिनी, शासकीय कार्यालयाचे कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.सदर लक्षवेधीसाठी अध्यक्ष राम येवले यांचे मार्गदर्शन लाभले.
लक्षवेधी दिनानिमित्त निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 21:58 IST
अखिल भारतीय सरकारी कर्मचारी महासंघ, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा भंडारा, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ भंडारा यांच्या संयुक्त आवाहननुसार कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारला शासनाप्रती तीव्र असंतोष व्यक्त करीत लक्षवेध दिन व निदर्शने करण्यात आले.
लक्षवेधी दिनानिमित्त निदर्शने
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना