शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्द धरणावर प्रकल्पग्रस्तांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 06:00 IST

दुपारपासूनच भंडारा व नागपूर जिल्ह्यातील पाथरी, मेंढा, अर्जुनी, चिचखेडा, गोसीखुर्द, नवेगाव, बोथली, गाडेघाट, आंभोरा आदी गावातील प्रकल्पग्रस्त येत होते. दुपारी २ वाजता सर्व प्रकल्पग्रस्त येताच त्यांनी घोषणा, नारेबाजी करून गोसीखुर्द धरणाचा परिसर दणानून सोडला.

ठळक मुद्देघोषणांनी परिसर दणाणला : मागण्यांचे निवेदन दिले सरकारला

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : गोसीखुर्द धरणाच्या भूमिपुजनाला ३१ वर्ष होवूनही ना धरण पूर्ण झाले ना प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सुटल्या. अशा कैचीत सापडलेल्या गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांनी मोठ्या संख्येने धरणावर एकत्र येवून नागपूर येथील विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काल गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने आयोजित केलेल्या विविध मागण्यांसाठी निदर्शने करून सरकारचे लक्ष वेधून घेतले.दुपारपासूनच भंडारा व नागपूर जिल्ह्यातील पाथरी, मेंढा, अर्जुनी, चिचखेडा, गोसीखुर्द, नवेगाव, बोथली, गाडेघाट, आंभोरा आदी गावातील प्रकल्पग्रस्त येत होते. दुपारी २ वाजता सर्व प्रकल्पग्रस्त येताच त्यांनी घोषणा, नारेबाजी करून गोसीखुर्द धरणाचा परिसर दणानून सोडला. प्रकल्पग्रस्त युवकांना रोजगार मिळालाच पाहिजे, मच्छीमार प्रकल्पग्रस्तांना धरणावर मासेमारीचा हक्क द्या, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे आदी घोषणा प्रकल्पग्रस्त देत होते. संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रकल्पग्रस्तांना मार्गदर्शन करून त्यांच्या समस्या मांडल्या.गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व्हावे, पुनर्वसन स्थळी मुलभूत सुविधा मिळाव्या, प्रकल्पग्रस्तांना रोजगाराची साधने द्यावी, भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे अनेक कुटुंबांना दोन लाख ९० हजार रूपये वाटप केले नाही ते वाटप करावे, पाथरी व अनेक गावातील समस्या सोडवाव्या, धरणात मच्छीमार प्रकल्पग्रस्तांना मासेमारीचा हक्क मिळावा, भंडारा जिल्ह्यातील खापरी रेहपाडे व नागपूर जिल्ह्यातील टेकेपार, रूयाड आदी गावांचे पुनर्वसन व्हावे आदी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या होत्या.आंदोलनस्थळी दोन तासाचे पवनीचे नायब तहसीलदार मयूर चौधरी यांनी येवून मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासनाच्या नावाने प्रकल्पग्रस्तांनी दिलेले मागण्यांचे निवेदन स्विकारून सरकारला पाठविण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनावर प्रकल्पग्रस्तांनी आपले आंदोलन संपविले. आंदोलनाचे नेतृत्व संघर्ष समितीचे संयोजक विलास भोंगाडे यांनी केले. आंदोलनात धर्मराज भुरे, दादा आगरे, समीक्षा गणवीर, रमेश भेंडारकर, सीताराम रेहपाडे, गुलाब मेश्राम, सोमेश्वर भुरे, झिबल गणवीर, नामदेव तितिरमारे, किशोर समरीत, माणिक गेडाम, विनोद शेंडे आदींसह मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते. पवनी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प