मोहाडी : तालुका कृषी अधिकारी कार्यालय मोहाडी तर्फे शेतकऱ्यांना कमी खर्चात भात पिकाची रोवणी करता यावी, यासाठी मशिनद्वारे रोवणी करण्याच्या पध्दतीचे प्रात्याक्षिक दहेगाव येथे करण्यात आले. या विभागातर्फे १९ एकरात धानपिकाची पेरणी करण्यात आली असुन संपुर्ण १९ एकरात या मशिनद्वारे रोवणी करण्यात येणार आहे.धान पिकाची पेरणी व रोवणी यांत्रिक पध्दतीने कशी केली जाते तसेच कमी खर्चात हे शक्य आहे की नाही याचे प्रात्याक्षिक दाखविण्यात येत आहेत. यासाठी दहेगाव येथील ७ एकर, रोहणा येथील ३ एकर, बेटाळा येथील ९ एकरात धानाची पेरणी करण्यात आली. या मशिनद्वारे कमी खर्चात व कमी वेळात रोवणी पुर्ण होते. कृषी कार्यालयाच्या या प्रात्याक्षिक दाखविण्यात महिलांनी सुध्दा ही मशिन चालवुन दाखविली. त्यामुळे ही मशीन चालविणे किती सोपे आहे हे शेतकऱ्यांना कळले. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी किशोर पाथरीकर, मंडळ कृषी अधिकारी राहुल गायकवाड, पर्यवेक्षक झलके आदी कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
यंत्राद्वारे रोवणीचे प्रात्यक्षिक
By admin | Updated: July 24, 2016 00:30 IST